कोरोना चाचण्याच्या नियमात ICMRने मोठे बदल केले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 19 : देशात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 31 मे पर्यंत लागू असलेला लॉकडाऊन वाढवला आहे. त्यातच लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यापासून विविध राज्यातील मजूरांचे लोंढे सध्याच्या घडीला आपल्या राज्यात परत असल्यामुळे इंडियन कॉउन्सिल ऑफ मेडिलक रिसर्चने (ICMR) कोरोना चाचणीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता प्रवासी मजूर, रुग्णालयात असलेले कोरोना रुग्ण आणि पहिल्या फळीत काम करणारे कोरोना वॉरिअरर्सच्या तपासणीसाठी नियमाच बदल करण्यात आले आहेत.

आयसीएमआरने केलेल्या बदलानुसार प्रवासी आणि घरी परतणाऱ्या लोकांमध्ये जर इन्फ्लूएन्झा सारख्या आजाराची लक्षणे दिसली तर सात दिवसांच्या आत त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.

रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांना किंवा पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोरोना वॉरिअर्समध्ये इन्फ्लूएन्झा सारख्या रोगाचे (ILI) लक्षणे दिसल्यास त्यांची ही RT-PCR चाचणी केली जाणार.

त्याचबरोबर एखाद्या संक्रमित रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या आणि अंत्यत गंभीर परिस्थिती राहणाऱ्यांना, तसेच ज्यांच्यात लक्षणे दिसत नाहीत, त्यांच्या संपर्कात आल्यानंतर पाचव्या आणि दहाव्या दिवसाच्या दरम्यान तपासणी केली जाईल. आतापर्यंत अशा प्रकरणांची पाचव्या आणि 14 व्या दिवसा दरम्यान एकदा चौकशी केली जात आहे. आयसीएमआरने देशात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता आपल्या रणनीतीमध्ये काही बदल केले आहे. नव्या रणनीतीचे उद्देश संक्रमण आणि प्रसार रोखणे हा आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!