स्थैर्य, फलटण, दि. २२ : आपले कर्तव्य बजावत असलेल्या बिरदेवनगर, जाधववाडी ता. फलटण येथील परिचरिकेला कोरोनाची लागण झाली होती, तिला पुढील उपचारासाठी सातारा येथे हलविण्यात आले होते. त्या महिलेचा सलग दुसरा स्वॅब निगेटिव्ह आल्याने तिला काल (गुरुवारी) घरी सोडण्यात आले. या वेळी तिचे ती राहत असलेल्या ईमारती समोर रांगोळी, फुलांचा वर्षाव करीत टाळ्यांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले व तिच्या या कार्याला सलाम करीत तिचे बिरदेवनगर वासीयांना स्वागत केले.
तरडगाव ची पहिली डॉक्टर युवतीला कोरोना झाल्यानंतर तिच्या घरातील लोकांचे स्वॅब घेण्यात आले होते, त्या दरम्यान तिच्या भाच्याला कोरोना झाल्याचे दिसून आले या वेळी त्याला येथील विलगिकरण कक्षात ठवेले होते. त्या वेळी त्याची दाढ दुखत होती. त्या दरम्यान ही परिचारिका त्याची दाढ तपासण्यासाठी गेली असता तिला कोरोनाची बाधा झाली होती. त्या नंतर फलटण तालुक्यात खळबळ माजली होती. मात्र पुढील काळात सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र सुदैवानं तिच्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या त्या मुळे तिला आज घरी सोडण्यात आले आहे.
कर्तव्य बजावत असताना तिला कोरोनाची बाधा झाली होती. त्या नंतर ती राहत असलेल्या इमारतीसह संपूर्ण बिरदेवनगर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. त्या ठिकाणी ग्रामपंचायत जाधववाडीचे सरपंच मुनीश जाधव, उपसरपंच नंदिनी ज्ञानेश्वर सावंत यांनी तेथील रहिवाशांना संपूर्ण मदत करीत किराणा, दूध, भाजीपाला यासह इतर अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा करीत आपले कर्तव्य बजवाले होते. आज त्या परिचरिकेला घरी सोडल्यानंतर तिचे स्वागत करण्यासाठी तेथील लोकांनी घरासमोर रांगोळी काढून फुलांच्या वर्षाव करीत तिचे शानदार स्वागत करण्यात आले आहे.