दैनिक स्थैर्य । दि. ३१ जुलै २०२२ । सातारा । सातारा शहरालगत बोगदा ते शेंद्रे मार्गावर कुरणेश्वर गणपती मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या दुर्मिळ वनौषधी उद्या नात गुस्ताविया ऑगस्टस म्हणजेच स्वर्गीय कमळं उमलले आहे. या फुलाचे सौंदर्य आणि वैशिष्टय साताऱ्याचे निसर्ग अभ्यासक उमेश करंबेळकर यांनी आपल्या फेसबुक पोस्ट द्वारे शेअर केली आहे. या पोस्टमध्ये स्वर्गीय कमळाची माहिती देताना करंबेळकर म्हणतात सकाळी फेसबुक वर मेमरीमध्ये या फुलाचा चार वर्षांपूर्वीचा फोटो टाकलेला आढळला आणि गंमत म्हणजे कुरणेश्वर मधील या झाडाला यावर्षी पाच कळ्या आल्या आहेत. त्यातील एक केव्हा उमलणार याची वाट बघत होतो. गेले दहा दिवस ती कळी दिसत होती आणि नेमकं आज हे फुल उमललं आणि खूप आनंद झाला अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
ते पुढे म्हणाले, निसर्गदेखील त्याचे चक्र सांभाळतो (कालचक्र) या फुलाचे नाव आहे. गुस्ताव्हिया ऑगस्टा हे नाव कार्ल लिनियस यांनी दिले. गुस्ताव्हिया हे स्वीडनचे मंत्री होते आणि त्यांनी लिनियसला खूप मदत केली. लिनिअसने जी नावं दिली वनस्पतींना त्यात त्याने त्याच्या उपकर्त्यांचे नावं गुंतलेली आहेत म्हणून त्याने या फुलाचे नाव गुस्ताविया ऑगस्टा असं ठेवलं. ही मूळची दक्षिण अमेरिकेतली वनस्पती आता युरोपमध्ये ती स्वीडनमध्ये वाढते. आमच्या सातारमध्ये कुरणेश्वर येथील जैवविविधता उद्यानात दोन झाडे आहेत त्यातील या झाडाला गेल्या दोन वर्षापासून गेल्या चार वर्षापासून फुले येतात पण ती केव्हा येतात ते समजतच नाही कधी. कधी सुदैवाने यावर्षी हे उमललेले दिसले. हे स्वर्गीय कमळ आज सायंकाळपर्यंत कोमेजून जाईल पण या झाडाला आणखी चार कळ्या असल्याने कदाचित पुढील आठवडयात पुन्हा नवीन फुल पहायला मिळेल असा दावा करंबेळकर यांनी केला.