वावरहिरेत आरोग्य सर्वेक्षणास होणार सुरुवात


 

स्थैर्य, वावरहिरे, दि. २६  (अनिल अवघडे) : संपुर्ण राज्यात  कोरोना जनजागृतीसाठी आणि आरोग्य सर्वेक्षणासाठी शासनाने  ‘माझा गाव माझी जबाबदारी ‘मोहिम हाती घेतली.  वावरहिर्‍यातही प्राथमिक आरोग्य उपकेंद्राअंतर्गत हि आरोग्य मोहिम राबवण्यात येणार असुन या मोहिमेंतर्गत वावरहिरे प्राथमिक  आरोग्य उपकेंद्रातील आरोग्यपथक यांचाकडुन  गावातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी  करण्यात येणार आहे. यासाठी गावातील संपुर्ण कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण करण्यासाठी ग्रामसेवक हर्षद शिंदे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आरोग्यपथकातील आरोग्यसेवक व आशा कर्मचारी यांना सॅनीटायझर, इन्फ्रारेड,थर्मामीटर, पल्स ऑक्सीमिटर, हॅण्ड ग्लोज इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले त्यावेळी  सरपंच चंद्रकांत वाघ, सदस्य मल्हारी  जाधव,ग्रामपंचायत सदस्य  व ग्रामस्थ उपस्थित होते.या मोहिमेमुळे कोरोनाचे पुर्वनिदान होण्यास मदत होणार आहे, प्रत्येक कुटुंबापर्यंत  पोहचणे या मोहिमेमुळे शक्य होणार आहे.नागरिकांनी आपल्या घरी आरोग्य तपासणी, माहिती,सुचना आदीसाठी येणार्‍या आरोग्य पथकास पुर्ण सहकार्य  करण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनामार्फत करण्यात आले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!