स्थैर्य, नागपूर, दि. ११: मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इडंस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर, पुणे यांच्याकडून जिल्हयाला 42 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व 5 बाय-पंप भेट देण्यात आले आहेत. त्यांचे वितरण पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते आज बचतभवन येथे करण्यात आले.
ग्रामिण भागासाठी 12 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकार यांना देण्यात आले. तर भाऊसाहेब मुळक आर्युवेद महाविदयालय (केडीके) नंदनवन, बुटीबोरी व उमरेड येथील महाविद्यालयाला प्रत्येकी 10 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर वितरीत करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्रात लवकरच सुरू होणाऱ्या कोविड केंद्राला 5 बाय-पंप भेट देण्यात आले. या उपकरणांमुळे कोवीड रूग्णांवर उपचार करण्यासाठी मदत होईल.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, डॉ. अजय केवलीया यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत शिपाई किशोर बाबुराव साळवे यांचा कर्तव्यावर असतांना कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यु झाला. त्यांच्या पत्नी भारती साळवे यांना आज 50 लक्ष रूपयांच्या सानुग्रह सहायाचा धनादेश पालकमंत्री यांच्या हस्ते देण्यात आला.