दैनिक स्थैर्य । दि.०७ एप्रिल २०२२ । लोणंद । कोरोना महामारीमुळे लहान मुलांच्या प्रत्यक्ष शिक्षणामध्ये जवळपास दोन वर्ष्याचा खंड पडला होता. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नवनवीन उपक्रमांनी पालकांचा मराठी शाळांकडे कल वाढावा म्हणून चालू शैक्षणिक वर्षापासून पहिलीमध्ये मुलांना दाखल करण्याअगोदर शाळा पूर्वतयारी मेळावा हा उपक्रम हाती घेतला आहे. त्या कार्यक्रम प्रसंगी बोलताना पालकांचा मराठी शाळांकडे वाढत असलेला कल भूषणावह असल्याचे उद्गार ॲड.गजेंद्र मुसळे यांनी काढले.
शाळेमध्ये दाखल होण्याआधीच मुलांची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमता वाढवणे आणि मुलांना समाधीटपणे वावरता यावे यासाठी ह्या उपक्रमाची सुरुवात शासनाच्या वतीने करण्यात आली आहे.मुले शाळेमध्ये प्रत्यक्ष दाखल होण्यापूर्वी तीन टप्प्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.कोरोनाकाळात घरात बसून लहान मुलांमध्ये एकलकोंडेपणा तयार झाला असल्यामुळे शाळा पूर्वतयारी मेळाव्यामुळे मुलांच्या मनात शिक्षणाविषयी आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे.
त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांचा मराठी शाळांमध्ये प्रवेश घेऊन सर्वगुणसंपन्न बनवावे असे आवाहन केले. यावेळी सुखेड गावचे सरपंच हभप भिमराव धायगुडे, उपसरपंच अर्चना धायगुडे, ग्रा.पं.सदस्य रविंद्र धायगुडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंकुश धायगुडे,यात्रा कमिटीचे अध्यक्ष संतोष धायगुडे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अक्षय धायगुडे,सुखेड शाळा मुख्याध्यापक बाळासाहेब सोळसकर,लोणंद मुली शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता मुसळे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सोनाली भिसे, शिक्षक अशोक वाघोले, शिक्षिका जयश्री ननावरे, अंगणवाडी सेविका वैशाली धायगुडे, दादा धायगुडे, तात्या गुलदगड तसेच नागरिक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी अंकुश धायगुडे, अनिता मुसळे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत जयश्री ननावरे व प्रास्ताविक अशोक वाघोले यांनी केले.आभार बाळासाहेब सोळसकर यांनी मानले.