स्थैर्य, मुंबई, दि. २८ : लॉकडाऊन सरकारने खुशाल लावावा, आम्ही नागरिकांना लॉकडाऊन मोडायचं आवाहन करू, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. सरकार सर्वसामान्यांच्या पोटा-पाण्याचे प्रश्न सोडवू शकणार नसेल तर लॉकडाऊन मोडावं लागेल. असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊनचा विरोध केला आहे.
“कोरोनासंदर्भातील आकडे साशंकता निर्माण करणारे, मृत्यूदर, रिकव्हरी रेट यांचे आकडे फसवे आहेत. हे गणित सरकारनं समजून सांगावं. यातून भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे,” असं आंबेडकर म्हणाले.
तसेच, आमदार, खासदार, माजी आमदार-खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांची कोरोना चाचणी करण्याचा वटहुकूम मुख्यमंत्र्यांनी काढावा, असं आवाहन आंबेडकरांनी केलंय.