
दैनिक स्थैर्य | दि. 25 फेब्रुवारी 2025 | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टीचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सुरक्षेत वाढ करून त्यांना आता झेड सुरक्षा देण्यात आलेली आहे. राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना झेड सुरक्षा देण्यात येते त्यामध्ये आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सुरक्षा वाढवून मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस नक्की कोणता संदेश दिलेला आहे ? त्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
राज्यामध्ये विधानसभा निवडणूक संपन्न झाल्यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरविण्यात यावी; असे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य शासनाला दिले होते. त्यानंतर राज्य शासनाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली व अवघ्या काही दिवसातच वाय प्लस एस्कॉर्ट सुरक्षा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करून झेड सिक्युरिटी देण्यात आलेली आहे.
राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झेड प्लस सिक्युरिटी असून झेड सुरक्षा ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली आहे. यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सुद्धा समावेश आहे.
राज्यातील माजी मंत्री माजी, आमदार व माजी खासदारांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेला होता. त्यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना झेड दर्जाची सुरक्षा दिली असल्याने येणाऱ्या काळामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगू लागलेल्या आहेत.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली असली तरी सुद्धा ते फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यामध्ये सदरील सुरक्षा स्वीकारणार नसल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांच्याकडून समोर येत आहे. याचे कारण सुद्धा सर्वसामान्य नागरिकांकडे जाताना किंवा त्यांना भेटताना कोणत्याही सुरक्षा यंत्रणाची चौकड मध्ये नसावी हे प्रमुख कारण असल्याचे समजत आहे.