फलटण तालुक्यात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद; विडणीसह 41 गावांत नागरिकांच्या समस्या जागीच मार्गी


दैनिक स्थैर्य । दि. ०८ जानेवारी २०२५ । विडणी । माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या संकल्पनेतून फलटण तालुक्यातील निरा देवघर लाभक्षेत्रातील गावांमध्ये ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आज विडणी येथे झालेल्या दौऱ्यात शेतकरी व नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्या जागीच सोडविण्यात आल्या.

या उपक्रमांतर्गत नीरा देवघर पाणी वितरण व्यवस्था, महसूल, कृषी, महावितरण, पोलिस प्रशासन, पंचायत समितीचे विविध विभाग, पशुवैद्यकीय, आरोग्य, महिला व बालकल्याण, वन विभाग, जलसंधारण, धोम बालकवडी, नीरा उजवा कालवा, सार्वजनिक बांधकाम विभाग (जिल्हा परिषद व महाराष्ट्र शासन), सामाजिक वनीकरण, शिक्षण, जीवन प्राधिकरण, पाणीपुरवठा, भू-अभिलेख, परिवहन महामंडळ, एनएचएआय (पालखी महामार्ग), रेल्वे प्रशासन, पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नियोजित दौऱ्यात नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेऊन अनेक प्रश्नांचे तात्काळ निराकरण करण्यात आले. ज्या अडचणी तातडीने सोडविणे शक्य नव्हते, त्या संदर्भात संबंधित विभागांचे अधिकारी व नागरिकांची संयुक्त बैठक घेऊन ठोस तोडगा काढण्याचे स्पष्ट निर्देश आमदार सचिन पाटील यांनी दिले.

आतापर्यंत तब्बल 41 गावांमध्ये हा दौरा पार पडला असून, प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा मोठा सहभाग व सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे. “असा आमदार आम्ही यापूर्वी कधी पाहिला नाही,” अशा शब्दांत नागरिकांनी आमदार सचिन पाटील यांचे आभार मानत गौरवोद्गार काढले.


Back to top button
Don`t copy text!