
दैनिक स्थैर्य । दि.०८ मार्च २०२२ । सातारा । मेणवली रस्त्यावर राजयुग कूषी पर्यटन केंद्र या हॉटिलच्या लगत बांधकाम करत असताना हटकले म्हणून दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा सात जणांवर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे गदीं मारामारी करीता आलेल्या गुंडांना तात्काळ अटक व गावठी पिस्टल व फॉर्च्युनर गाडी हस्तगत करण्यात आली आहे. यातील एक तडीपार गुंड पळून जाण्यात यशस्वी झाला असून एक जण तडीपार आहे. माझा चुलत भाऊ सचिन येवले हा तडीपार आहे. त्याचे सोबत माझे वडिलाजित जमिनीचे वाटपावरुन वाद चालु आहेत.सचिन येवले याचे राजयुग कूषी पर्यटन केंद्र या हटिलचे बाजूला कंपाउंड दॉलचे काम चालू असल्याचे दिसल्याने आम्ही काम थांबवण्या करीता तेथे गेलो असता त्याठिकाणी नंबर नसलेली पांढ-या रंगाच्या फॉरच्युनर गाडी उभा होती व गाडीचे जवळ काही लोक उभा होते. ते लोक आमच्याकडे आले. मला व माझ्या पलीला शिवीगाळ दमदाटी करुन तु येथे थांबायचे नाहीस येथून निघून जा,आम्हाला सचिन येवलेने पाठविले आहे असे म्हणाले.त्याचे पैकी एकाने त्याचेकडे असलेल्या पिस्टलचा धाक दाखवून आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे अशी तक्रार सागर भिकू येवले ( मेणवली रोड,ता.वाई) यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी सागर संदीप साबळे ( सातारा) हा तडीपार गुंड पळून गेला .तर सचिन येवले तडीपार आहे.त्यावेळी पोलिसांनी साहिल अय्याज इनामदार (वय २३ ,सातारा), राहुल अशोक कदम (२८, खोजेवाडी,सातारा)महेंद्र लक्ष्मण गायकवाड ( २८, खोजेवाडी) सागर अनिल पडवळ (२७ ,शेंद्रे ता सातारा) या चार जणांना अटक घेतले.त्याच्याकडे अवैध पिस्तूल सापडले ते पोलिसांनी जप्त केले.पोलिसांनी फॉर्च्युनर गाडीही जप्त केली आहे.त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे,उपनिरीक्षक कृष्णा पवार,सहायक उपनिरीक्षक विजय शिर्के,किरण निबाळकर,श्रावण राठोड,प्रसाद दुदुस्कर,रेखा तांबे,ज्योती सुतार,सागर धुमाळ,सुमित मोहिते,अक्षय नेवसे,हेमंत शिंदे यांनी भाग घेतला. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय शिर्के करत आहेत.