चुलीतून निघणारा धूर फार फार तर एखादी भिंत काळी करेल.
आकाशाला काळं करायचं सामर्थ्य त्या धुरात नसतं,
कोणी तुमचा तिरस्कार करीत असेल तर खुशाल करु द्या.
तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. तिरस्कार करण्याचा धूर आपणाला अडथळा नव्हे. तर पुढं जाण्यासाठी सावधानेचा इशार असतो. आपण धूरात असू नाय तर तिरस्कारात सतत चांगुलपणाचा विचार करावा. धूराच बरं असतं त्यांन दिसत नाही. पण डोळ्यातील चांगुलपणाचा पडदा अधिकच चांगला होता.
आपणाला सारं स्पष्ट नीटपणे दिसतंय. हे त्या धूररुपी तिरस्काराच चांगुलपणाच लक्षण आहे. धूरानंतर जाळ ठरलेलाच असतो.धूपणं रुपी तिरस्कार वाट्याला आलाच तर त्या जाळाची किंमत व गंमत कळणार आहे.
तिरस्कार हा आपल्यासाठी प्रेरणादायी पुरस्कार समजावा. आपल्यातील चांगुलपणाला सतत झाळाळी देण्याच काम तिरस्कार करीत असतो. आपल चांगुलपणाच कार्य काळं करण्याच्या फंद्यात त्यांच कार्य काळवंडत. पण तिरस्काररुपी नजरेनं आपण आपल्यातही ती वृत्ती वाढीस लागू देऊ नये. अन्यथा त्याच्यात अन् आपल्यात फरक तो काय?
चुलीतील धूर भिंत काळी करीत असला तरी जीवनरुपी अग्नी तयार करुन जीवननौका चालवतो. आता नौका चालताना वादळ, वारे, हेलकावे सहन करणं आलेच. त्यातून तरुन जाणं महत्त्वाचे . खचून जाऊ नये.
तिरस्कारुपी धूर हा आपल्यातील चांगुलपणाला प्रज्वलीत करण्याच काम करीत असतो. काळ सर्वावर प्रभावी उपाय व उतारा आहे. आपण मार्गस्थ असावे.
तिरस्कार चांगुलपणाचा खरा पुरस्कार
आपलाच स्नेहवर्धक – प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१