दैनिक स्थैर्य । दि. २९ मे २०२३ । सांगली । बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला स्वतःच्या पायावर उभा राहत आहेत. त्यामुळे बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट पुर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केला.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने सांगली येथील 7 Avenue MALL येथे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शनाला कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी भेट दिली, यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, बचत गटाच्या माध्यमातून महिला एकत्र येवून आपला व आपल्या परिवारजनांची प्रगती साधत आहेत. महिला बचत गटांनी व्यवसायामध्ये केलेली प्रगती ही उल्लेखनीय आहे. बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन पाहुन आनंद होत आहे. शासन नेहमीच अशा बचत गटांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे केले.
यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला भेटी देऊन महिलांशी संवाद साधला. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन यशस्वी उद्योजिका होता येते, यासाठी तुम्ही प्रयत्न करा. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे असे आश्वासन त्यांनी दिले.