देशाची एकता आणि स्वतंत्रचे रक्षण हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनाचे लक्ष्य होते.  – माधुरी भोसले


 


स्थैर्य, वावरहिरे, दि.३: विरकरवाडी ता.माण येथे नेहरु युवा मंडळ व मैञेय फाउंडेशन वावरहिरे यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वतंञ भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंञी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 145वी जयंत्ती व राष्ट्रीय एकता दिनाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमावेळी नेहरु युवा केंद्र माण तालुका समन्वयक माधुरी भोसले युवकांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. स्वातंञच्या आंदोलनात महत्वाची भुमिका बजावणार्‍या आणि देश स्वतंञ झाल्यानंतर पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंञीपद देण्यात आले ते म्हणजे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल होत.अनेक संस्थाने स्वातंञ भारतात विलीन करुन स्वतः मधील पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी दाखवुन दिला असे प्रतिपादन नेहरु युवा केंद्र माण तालुका समन्वयक माधुरी भोसले यांनी केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आपल्या देशाची एकता आणि स्वातंञ्याचे रक्षण हे त्यांच्या जीवनाचे खरे लक्ष्य होते.नाविकांच्या विद्रोहाला देखील त्यांनीच इशारा देवुन शांत केले.घटना सभेत देशाची एकता भंग पावू नये.याची दक्षता घेवुन देशाच्या एकतेसाठी हिंदीला राष्ट्रभाषाचा दर्जा देण्यात आल्याचे आपल्या मनोगतातुन व्यक्त केले.संपुर्ण भारतात सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता दिन म्हणुन साजरा केला जातो.यावेळी युवकांनी देशाची एकता टिकवुन ठेवण्याची भावना व्यक्त करणारी शप्पथ घेतली. अमर लोखंडे यांनी आभार मानले. यावेळी सचिन लवटे,रोहित यादव,रोहन सकट,सुरज गोरवे आदि मंडळातील पदाधिकारी ,सदस्य उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!