दैनिक स्थैर्य । दि. ०९ फेब्रुवारी २०२१ । पुसेगाव । सातारा व पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी दरोडा घालणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला पुसेगाव पोलिसांनी धडक कारवाई करून ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांची कसून चौकशी केली असून सव्वादोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्य काही गुन्हे या चौकशीत उघड होण्याची शक्यता आहे.
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक करुन त्यांचेकडुन चोरीच्या ५ मोटारसायकल, ९ मोबाईल, २ तलवारी व दरोडा टाकणेचे साहित्य असा एकूण दोन लाख पंचविस हजार रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
मागील काही दिवसापासुन वाढत्या मोटारसायकल चोरी, घरफोडी चोरीच्या अनुषंगाने मा. अजयकुमार बंसल पोलीस अधिक्षक सो, सातारा, मा.अजित बो-हाडे अपर पोलीस अधिक्षक सो. सातारा, मा.गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी सोकोरेगाव विभाग यांनी मार्गदर्शन करून पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करणेच्या सुचना दिलेल्या होत्या त्या अनुशंगाने दि. ६ रोजी रात्री १० वाजणेचे सुमारास पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत सपोनि संदिप शितोळे, सुनिल आबदागिरे, वैभव वसव पुष्कर जाधव उमेश देशमुख, अशोक सरक हे पेट्रोलींग करत असताना बुध, ता. खटाव गावचे हद्दीत राजापुर फाटा येथे काही संशयीत इसम उभे असलेचे दिसुन आलेने त्यांचेकडे विचारपुस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत शेताचे दिशेने पळून जावू लागले. त्यांचेवरील संशय बळावेलेने त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी दरोडा टाकणेचे उद्देशाने आलेबाबत सांगीतले. त्यांचेकडे त्यांचे ताब्यातील दोन प्लसर मोटारसायकल, दोन तलवारी, ५ मोबाईल १ स्क्रुडाव्हर, १ पक्कड, १ गज, व्हिलपाना असे दोराडा टाकणेचे साहित्य मिळुन आले. त्यांना पोलीस ठाणेस आणून त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी फलटण, पुणे, बारामती, पाटस, बिगवण परीसरात चोऱ्या केल्याची कबुली दिली.
पुसेगाव पोलीस ठाणेस गुरनं.३२/२०२२ गुन्हा दाखल करणेत आला असून त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांचेकडुन चोरीच्या एकुण ५ मोटारसायकल किं.अं. १ लाख ऐंशी हजार रुपये व एकुण ९ मोबाईल किं. अं. ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करणेत पुसेगाव पोलिसांना यश आलेले आहे. त्यांना अटक करून पोलीस कस्टडी घेणेत आलेली आहे. आरोपींनी आणखी काही गंभीर गुन्हे आहेत अगर कसे या बाबतचा अधिक तपास चालु असुन सपोनि संदिप शितोळे हे सदर गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधिक्षक अजित बो-हाडे, उपवभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप शितोळे, सुनिल आबदागीरे, अशोक सरक, वैभव वसव, पुष्कर जाधव, उमेश देशमुख, विजय खाडे, सचिन जगताप, दौलत कुदळे यांनी केली.