
दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२१ । वाठार स्टेशन । वाठार स्टेशनला दि.13 जूनला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी माय-लेकीच्या गळ्याला सुरा लावून सोन्याचे दागिने लंपास केले होते, त्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या हाती लागले असून इतर आणखीन दोन गुन्ह्यांयाचा तपास लावण्यात वाठार पोलीस स्टेशनला यश आले आहे.
सदरच्या संशयित आरोपींनी घरात घुसून फिल्मी स्टाईल प्रमाणे गळ्याला सुरा लावून व धाक दाखवून, जीवे मारण्याची धमकी देऊन सोन्याचे दागिने घेऊन भरधाव वेगाने मोटार सायकल वरुन पसार झाले होते. या चोरीचा वाठार स्टेशन येथील पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घडलेला गुन्हाच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व सपोनि स्वप्नील घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलिसांचे पथक तयार करण्यात आले, तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळाले. सदर जबरी चोरी करणारी टोळी वाठार पोलीस ठाणे कडून जेरबंद करण्यात आली असून सदर टोळीतील आरोपी 1) सुधाकर अशोक मोहिते वय 34 रा.कोतीज ता.कडेगाव जि.सांगली (सराईत गुन्हेगार) 2) अमोल शंकर सूर्यवंशी रा. बेलवडे, ता. कडेगाव जि. सांगली -( 5 प्यारा युनिट मधील जवान सध्या अरुणाचल प्रदेश येथे ड्युटीवर) 3) विनोद गुलाब कदम वय 26 रा. पांढरवाडी पोस्ट विसापूर ता.खटाव जि.सातारा 4) योगेश तुकाराम शिंदे रा.जाखणगाव ता.खटाव जि.सातारा 5) संतोष किसन निकम रा.गार्डी ता.खानापूर जि.सांगली (सोनार) निष्पन्न व आरोपीना अटक करून त्यांच्याकडून वाठार वडूज व विटा पोलीस स्टेशन च्या अंतर्गत घडलेल्या गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले असून सदरच्या संशयित आरोपींनी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून तीन गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेले सहा तोळे सोन्याचे दागिने व एक मोटारसायकल असा एकूण तीन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सपोनि स्वप्निल घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश पाटील, स.पो फौ.गुजर,भोसले,पो,ह,केंजळे,पो.ना तानाजी चव्हाण, पो.ना.सचिन जगताप, पो.ना.अतुल कुंभार, पो.ना.राहुल मोरे, पो.कॉ तुषार आडके, पो.कॉ खरात यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, सपोनि स्वप्नील घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील करीत आहेत.