फलटण बाजार समितीचे कामकाज नियमानुसारच; दिशाभूल करण्याचा काहींचा प्रयत्न : उपसभापती भगवानराव होळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 13 मार्च 2025 | फलटण | कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज हे पणन संचालकांच्या निर्देशानुसारच सुरू असून आगामी काळामध्ये सुद्धा त्यानुसार सुरू राहील. सन 2023 साली फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत असणाऱ्या गाळेधारकांची भाडे वाढ ही पणन संचालकांच्या निर्देशानुसार करण्यात आलेली होती. सर्व गाळेधारकांच्या पैकी 75% हून अधिक गाळेधारकांनी भाडे वाढ मान्य केलेली असून ते नियमित भाडे सुद्धा भरत असतात; काही ठराविकच भाडेकरू हे भाडे भरत नसून ते गाळेधारक मुद्दामून सर्वसामान्य शेतकऱ्यांची व जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर यांनी केला आहे.

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपसभापती भगवानराव होळकर बोलत होते. यावेळी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याबाबत अधिक माहिती देताना होळकर म्हणाले की, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीला गतवर्षांमध्ये टॉप २० बाजार समित्यांपैकी एक बाजार समिती म्हणून गणली जात आहे. ज्या बाजार समितीकडे कोणीही लक्ष देत नव्हते, ती बाजार समिती आज नावारूपास आणण्याचे काम आमचे नेते व सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे. बाजार समितीला विनाकारण बदनाम करण्याचे काम काही ठराविक पुढाऱ्यांकडून सुरू आहे.

राज्याच्या पणन संचनालयाच्या निर्देशानुसारच फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने भाडेवाढ केलेली आहे. वास्तविक पाहता सन 2019 साली भाडेवाढ होणे अपेक्षित होते, परंतु त्यावेळी कोरोना सारखी महाभयंकर परिस्थिती असल्यामुळे त्यावेळी भाडेवाढ करण्यात आलेली नव्हती. त्यानंतर सन 2023 साली गाळेधारकांची भाडेवाढ करण्यात आली व सदरील भाडे वाढ ही अत्यंत अल्प स्वरूपात असून सुद्धा काही ठराविक गाळेधारकच भाडेवाडीच्या विरोधात विविध ठिकाणी प्रतिक्रिया देत असल्याचे मत सुद्धा उपसभापती भगवानराव होळकर यांनी व्यक्त केले.

… तर बाजार समितीची निवडणूक का लढवली नाही ?; युवा नेते अक्षय गायकवाड यांचा खोचक सवाल

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी निवडणूक न लढवता आत्ता भाडेवाडीचा मुद्दा उपस्थित करून मुद्दामून शेतकऱ्यांची व जनतेची दिशाभूल करण्याचे कामकाज करीत आहेत. जर विरोधकांना बाजार समिती बद्दल कळवळा होता; तर त्यांनी बाजार समितीची निवडणूक का लढवली नाही ? असा खोचक सवाल सुद्धा बाजार समितीचे संचालक तथा कोळकी गावचे युवा नेते अक्षय गायकवाड यांनी सोशल मीडियाद्वारे उपस्थित केलेला आहे.


Back to top button
Don`t copy text!