जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना फलटण येथे अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि.24 : भारतीय राजकारणातील हिंदुत्व व हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रवर्तकांपैकी एक मानले जाणारे, भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 68 व्या बलिदान दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्यावतीने फलटण येथे अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, युवानेते अभिजीत नाईक निंबाळकर, कामगार नेते बाळासाहेब काशीद यांनीही आपले विचार मांडले. आभार युवा मोर्चाचे अध्यक्ष नानासो इवरे यांनी मानले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे राजेश शिंदे, राहुल शहा, वसिमभाई मणेर, सागर अभंग, सुनिल जाधव, किरण राऊत, संतोष सावंत, शशिकांत रणवरे, सोमनाथ एजगर, सुधीर जगदाळे, नितीन जगताप, तानाजी करळे, अल्पसंख्याक अध्यक्ष रियाजभाई इनामदार, सौ.मुक्ती शहा, सौ.उषा राऊत, सौ.विजया कदम, सौ.ज्योती इंगवले, सौ.विमल भुजबळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!