श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२५ चे भूमिपूजन संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २५ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटणअंतर्गत दिनांक २ जानेवारी ते ६ जानेवारी या कालावधीत होणार्‍या श्रीमंत मालोजीराजे कृषि प्रदर्शन २०२५ च्या ग्राऊंडचे भूमिपूजन फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मे गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य नितीन गांधी, डॉ. सी. डी. पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी अरविंद निकम यांच्या हस्ते श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुलातील क्रिडा मैदानावर संपन्न झाला.

कृषी प्रदर्शनाद्वारे कृषी क्षेत्रातील नवीन संशोधित व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. कृषी क्षेत्राशी निगडित २०० हून अधिक कृषीनिविष्ठा कंपन्यांचा सहभाग कृषी प्रदर्शनामध्ये होणार आहे. नामांकित ट्रॅक्टर कंपन्या, शेतीची अवजारे, सेंद्रिय शेती, पशुसंवर्धन व संगोपन, डेरी, पोल्ट्री, पॉली हाऊस, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, बीज व रोपे, रोपवाटिका, जैविक तंत्रज्ञान, कृषि उपयोगी पुस्तके, कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञान यांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.

या कृषी प्रदर्शनादरम्यान विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, भरड धान्याचे महत्व, कृषी उद्योजकता विकास, दुग्धव्यवसाय यांचा समावेश आहे.

भूमिपूजनप्रसंगी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनियर कॉलेज फलटणचे प्राचार्य एस. आर. वेदपाठक, पद्मभूषण डॉ. सुखात्मे कृषि तंत्रनिकेतन फलटणचे प्राचार्य जे. एस. माने, पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका विद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. इंगवले, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण येथील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!