स्थैर्य, सातारा दि. 16 : आज स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावरती आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवणारे तसेच शोधनिबंध हा छंद जोपासून उपयुक्तता वाढवावी असे अष्टपैलू गुण असणारे डॉ. रोहन अकोलकर आणि त्यांच्या अथर्व फिजियोथेरेपी सेंटर ह्याच्या सेवेबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
प्राथमिक शिक्षण गावात तर मास्टर डिग्री स्विझर्लंडमध्ये
डॉ. रोहन अकोलकर यांनी छोट्याश्या गावातून चालू झालेली ही वाटचाल खूपच अविस्मरणीय अशी बनवत फिफा वर्ल्डकपमध्ये फिजियोथेरेपिस्ट डॉक्टर म्हणून जाणारे ते एकमेव भारतीय डॉक्टर आहेत. इंदापूर व बारामती सारख्या ठिकाणी माध्यमिक शिक्षणाचे धडे घेत पुढे त्यांनी 2006 मध्ये नाशिक विद्यापीठातून मेडिकलची डिग्री मिळवली, 2008 मध्ये फिजियोथेरेपीचा ऍडव्हान्स कोर्स करून त्यांनी तिथेच न थांबता 2010 साली पुण्यातील पुणे विद्यापीठातून मास्टर डिग्री ऑफ फिजियोथेरेपी ही पदवी मिळवली ह्या डिग्री बरोबरच त्यांनी अजून एक महत्वपूर्ण डिग्री मिळवली ती म्हणजे हॉस्पिटल व्यवस्थापन (MBA in Hospital Administration). त्याच वर्षी म्हणजे 2011 मधेच त्यांनी झुरीच, स्वीझेरर्लंड येथून फिफा डिप्लोमा इन स्पोर्ट मेडीसीन हा कोर्से देखील पूर्ण केला. म्हणतात ना माणूस आयुष्यभर शिकत असतो असेच काम डॉक्टर नेहमी करतात आणि स्वतःला अपडेट ठेवतात. 2016 साली देखील त्यांनी सिंगापूर येथून स्पोर्ट मेडीसीनमध्ये मानांकित अशी पी.एच. डी. पूर्ण केली. ह्या शैक्षणिक गोष्टी नंतर वेळ येते ती व्यावसायिक वाटचालीची.
स्वप्नातील लंडन आले प्रत्यक्षात भेटीला
डॉक्टरांना फिफा वर्ल्डकपमध्ये सहभाग घ्यावा अशी त्यांची पहिल्यापासून इच्छा होती. डॉ. रोहन अकोलकर यांच्यामध्ये असणारी इच्छाशक्ती आणि त्यांची मेहनत ह्यामुळे त्यांनी लंडन येथील फिफा मेडिकल सेंटर ऑफ एक्सलंस कॉन्फरन्समध्ये एक महत्वपूर्ण भूमिका बजावली आणि डॉ. रोहन अकोलकर यांच्या खूप साऱ्या गोष्टी आणि विचारांचा ह्या कॉन्फरन्समध्ये विचार-विनिमय करण्यात आला आणि त्या विचारंची आणि गोष्टींची अंबलबजावणी करण्यात आली.
पहिले भारतीय फिजियोथेरेपीस्ट ज्यांनी फिफा वर्ल्डकप प्रत्यक्ष अनुभवला
इच्छाशक्ती असेल तर पाहिलेलं स्वप्न स्वप्न राहत नाही ते सत्यात उतरतं. फिफा वर्ल्डकपला जाणे हे अनेकांचे स्वप्न असेल पण डॉ. रोहन अकोलकर यांनी स्वप्न पाहिलं की मी फिफा वर्ल्डकपला फिजियोथेरेपिस्ट म्हणून जाईन आणि भारताचे नाव अजून उज्वल करेन. फिफा वर्लकपमध्ये सहभागी होण्यासाठी परीक्षा द्यावी लागते ती परीक्षा डॉ. रोहन अकोलकर यांनी देऊन पहिल्याच स्ट्रोकमध्ये फिफामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा केला. 2018 मध्ये रशिया या ठिकाणी झालेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये पहिले भारतीय फिजियोथेरेपिस्ट डॉक्टर म्हणून नाव नोंदवले. ही त्यांच्या साठीच नव्हे तर भारतासाठी खूपच गर्वाची गोष्ट होती.
2011 मध्ये दिल्ली येथे झालेल्या कॉमन वेल्थ गेम्समध्ये देखील त्यांनी फिजियोथेरेपिस्ट म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
भारतामध्ये “पलसड इलेक्ट्रोमॅग्नेटीक चिकित्सकचे” जनक म्हणून डॉ. रोहन अकोलकर यांना संबोधले जाते. डॉ. रोहन अकोलकर यांच्याकडे असणारे उच्च शिक्षण आणि राष्ट्रीय, आणि अंतराष्ट्रीय पातळीवरचा प्रचंड मोठा अनुभव ह्यामुळे ते नावारूपाला येत आहेत.
आपल्याकडील शिक्षणाचा आणि अनुभवाचा उपयोग हा समाजाला व्हावा ह्या हेतूने त्यांनी बारामती तसेच फलटण येथे त्यांनी अथर्व फिजियोथेरेपी सेंटर स्थापन केले आहे. डॉ. रोहन अकोलकर हे खूप चांगल्याप्रकारे स्वतःमध्ये असणाऱ्या अनुभवाचा आणि सेंटरमध्ये असणाऱ्या अत्याधुनिक व जागतिक दर्ज्याच्या उपकरणांचा वापर करून पिडीत रुग्णांना शस्त्रक्रियेविना आणि औषधांविना उपचार देत आहेत आणि ह्याचा पिडीत रुग्णांना उपयोग होत आहे. अनेक रुग्णांना ह्या उपचारांचा खूप छान उपयोग होतोय. अथर्व फिजियोथेरेपी सेंटरमध्ये जर्मन टेक्नोलॉजीच्या मशीन्स उदा. शोकवेव थेरपी उपचार पद्धती, क्लास 4 लेझर उपकरण, पलसड इलेक्ट्रोमॅग्नेटीक चिकित्सक पद्धतीचा वापर, शास्त्रीय व्यायाम पद्धतीचा समन्वय साधून केली जाणारी उपचार पद्धती ह्यामुळे खांदेदुखी, गुडघेदुखी, मानदुखी, कंबरदुखी, पाठीच्या अनेक मांसपेशी आणि स्नायूपेशींचे दुखणे बरे करता येण्यास मदत होते.
ह्या शास्त्रीय उपचार पद्धतीमुळे अनेक शस्त्रक्रिया टाळता येऊ शकतात त्यामध्ये होणारा खर्च थांबवता येऊ शकतो त्यामुळे होणाऱ्या वेदना टाळू शकतो. पॅरालीसीस, मेंदूंचे होणारे आजार, लहान मुलांमध्ये असणारा मतिमंदत्व हे देखील योग्य उपचाराने आटोक्यात अनु शकतो. शस्त्रक्रिया आणि औषधांविना उपचार पद्धती हे डॉक्टरांचे ध्येय आहे तेव्हा नक्कीच ह्या डॉक्टरांच्या ध्येयाला सलाम आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.