
दैनिक स्थैर्य । दि.०३ मे २०२२ । सातारा । मराठा साम्राज्याच्या इतिहासात महाराणी येसूबाई हे त्याग आणि संयम याचे मूर्तीमंत उदाहरण आहे मातृत्व आणि कर्तुत्व यांचा मनोहारी संगम असणाऱ्या लढवय्या महाराणी येसूबाई यांनी इतिहासामध्ये त्यांच्य धीरोदात्त स्वभावाचे दर्शन घडवले मात्र इतिहासाने त्यांच्या कर्तृत्वाची म्हणावी तशी दखल घेतली नाही हे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यात आपणच कुठेतरी कमी पडलो असे प्रतिपादन सोलापूर ग्रामीण च्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले.
शाहूनगरी फाउंडेशन च्या वतीने पहिला महाराणी येसूबाई पुरस्कार सातपुते यांना येथील शाहू कला मंदिरात आयोजित कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला यावेळी सातारा नगरीचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले ,सत्वशीलाराजे उर्फ आक्का महाराज, शाहूनगरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वृषाली राजेभोसले, विक्रम सिंह राजे, प्राचार्य यशवंत पाटणे ,ताराराणी अभिनेत्री दीप्ती भागवत शाहूनगर फाउंडेशनचे उपाध्यक्ष विनोद कुलकर्णी ,खजिनदार मनोज शेंडे, विश्वस्त शंकर माळवदे व विवेक निकम व समाजसेवक सुशांत मोरे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
तेजस्वी सातपुते बोलताना पुढे म्हणाल्या स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये महाराणी येसूबाई यांचा फार मोठा वाटा आहे त्यांच्या समग्र जीवनाचा आढावा घेतल्यानंतर स्वराज्यासाठी त्यांनी केलेला त्याग आणि संयमी स्वभावाचे दर्शन इतिहासाच्या अनेक प्रसंगातून वेळोवेळी समोर येते कर्तुत्व आणि मातृत्व याचा दुहेरी संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये होता मला हा पहिला पुरस्कार तो दिला जात आहे तो पुरस्कार हा पुरस्कार नाहीतर माझ्या साठी एक आशीर्वाद आहे महा राणी जिजाऊ माता साहेबांनंतर स्वराज्याचे कुलमुखत्यार पद आणि शिक्के कट्यारीची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या महाराणी येसूबाई यांचे चरित्र मराठ्यांच्या इतिहासातील तेजस्वी अग्निकुंड आहे . त्यांच्या कर्तुत्वाला इतिहासाने पुरेसा वाव दिला नाही हे व्यक्तीचे चरित्र अधिक उजळ पणे समोर यायला हवे त्यांना समजून घेण्यामध्ये इतिहासाचे अभ्यासक म्हणून आपणच कुठेतरी कमी पडलो की काय अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली महाराणी येसूबाई यांच्यातील जबाबदारपणा चा मुख्य पैलू आपण जरा अंगीकारला तर निकोप समाजव्यवस्था निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असे त्या म्हणाल्या.
प्राचार्य यशवंत पाटणे म्हणाले महाराणी येसूबाई यांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलू मध्ये वैविध्य आणि कंगोरे आहेत त्यांच्या नावाचा पुरस्कार देणे आणि त्यांचे व्यक्तिमत्व समाजासमोर अधिक प्रभावीपणे आणणे हेच मोठे कार्य आहे . पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे . सातपुते मॅडम यांनी पोलीस अधीक्षक यां नात्याने प्रभावी कामगिरी करत भयमुक्त समाजाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे कर्तुत्व आणि संयम असणाऱ्या महाराणी येसूबाई यांच्या नावाचा पहिलाच पुरस्कार त्यांना प्रदान करणे हे एक मोठे औचित्य आहे कर्तृत्वाच्या धनी असणाऱ्या महाराणी येसूबाई या प्रत्येक स्त्रीला वंदनीय असाव्यात दूरगामी दृष्टी आणि लढवय्या बाणा हा प्रत्येक स्त्रीने जोपासला तर जीवनातल्या प्रत्येक आव्हानांचा त्या सामना करू शकतात.
शाहूनगरी फाउंडेशनच्या अध्यक्षा वृषालीराजे भोसले म्हणाल्या शाहूनगर फाउंडेशनच्या वतीने सातारकरांचा साठी दिल्लीत सामाजिक उपक्रम उपक्रम राबवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे सातारकरांच्या समस्या आणि ऐतिहासिक सातारा नगरीच्या परंपरा यांना उजाळा देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे . महाराणी येसूबाई यांच्या कर्तुत्वाला नमन झालेच पाहिजे छत्रपती शिवराय दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर अत्यंत धीराने स्वराज्य सांभाळणाऱ्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांचे चरित्र म्हणजे अत्यंत धोरणात्मक आणि संयमाचा मोठा इतिहास आहे त्या ऐतिहासिक आठवणींना कुठेतरी उजाळा मिळायला हवा म्हणून कर्तृत्ववान महिलांना समाजासमोर आणताना त्यांच्या नावाचा पुरस्कार देणे हे या पुरस्काराचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
ताराराणी फेम अभिनेत्री दीप्ती भागवत म्हणाल्या महाराणी येसूबाई हे व्यक्तिमत्व पडद्यावर सादर करताना प्रचंड दडपण आले होते मात्र यांच्यातील स्वराज्याच्या प्रती असलेली निष्ठा कर्तृत्व धडाडी संयम या पैलूंचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर हे व्यक्तिमत्व उभारताना यांच्या जीवनात घडलेल्या अनेक प्रसंगाची आठवण यांची मोठी मदत झाली कर्तुत्वान महिला साकारण्याचा मला विशेष आनंद होत आहे याच पैलुंचा मी माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये वापर करण्याचा निश्चित प्रयत्न करते येसूबाई सारखे व्यक्तिमत्व मला पडद्यावर साकारायला मिळाली हे मी माझे भाग्य समजते.
साताऱ्याचे नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले वृषाली राजेभोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत तेजस्वी सातपुते यांना समारंभपूर्वक महाराणी येसूबाई पुरस्कार प्रदान करण्यात आला सन्मानचिन्ह मानपत्र शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली शाहूनगर फाउंडेशनच्या वतीने विविध मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मोरे यांनी केले तर मानपत्राचे वाचन चित्रा भिसे यांनी केले कार्यक्रमासाठी साताऱ्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.