
दैनिक स्थैर्य । 22 मार्च 2025। फलटण । सातारा जिल्ह्याचे अशोक लेलँड मालवाहतूक वाहनाचे अधिकृत विक्रेते गजानन ऑटोमोबाईल्स प्रा. लि. यांच्यावतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गाडी खरेदी करणार्या ग्राहकांपैकी पहिल्या भाग्यवान विजेत्यास लकी ड्रॉने 100 सीसी मोटारसायकल जिकंण्याची संधी देण्यात आली होती.
तसेच गजानन ऑटोमोबाईल्सकडून प्रत्येक वाहन खरेदी करणार्या ग्राहकास वाहनाच्या बुकिंगवर 1 प्रवासी ट्रॉली बॅग व वाहन वितरण करते वेळी 1 चांदीचे नाणे गुढीपाडवा भेट म्हणून देण्यात येणार आहे.
गुरुवार (दि. 20) मार्च रोजी गजानन शोरूममध्ये या बंपर बक्षीसचा पहिल्या फेरीचा सोडत सोहळा ग्राहकांच्या उपस्थितीत उत्साहात झाला.
यावेळी पाडव्याचे 100 सीसी मोटारसायकल हे पहिले बंपर बक्षीस अशोक लेलँडचे ग्राहक सातारा येथील श्री. धीरज पवार यांना मिळाले. श्री पवार यांनी गजानन ऑटोमोबाइल्स मधून पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दोस्त एक्सेल आय 5 हे वाहन खरेदी केले आहे. भाग्यवान विजेत्या ग्राहकास बक्षिसांचे वितरण गजानन ऑटोमोबाईल्सचे डायरेक्टर सचिन शेळके, अशोक लेलँड कंपनीचे एरिया मॅनेजर वैभव तनेजा यांच्या हस्ते करण्यात आले.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कंपनीकडून सर्व ग्राहकांसाठी मालवाहतूक या क्षेत्रातील सर्वोत्तम कॅपॅसिटी असणारे वाहन साथी हे मॉडेल विशेष सवलतीमध्ये फक्त 7 लाख 11 हजार रुपये एवढ्या अल्पदरात खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय इतरही विशेष सवलत योजना व 100 % कर्ज सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.
गुढीपाडव्याचे मोटारसायकल बंपर बक्षीसाची अंतिम सोडत गुढीपाडव्या दिवशी रविवार (दि.31)रोजी गजानन शोरूममध्ये वाहन वितरण करते वेळी सर्व ग्राहकांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी आजच इच्छुक ग्राहकांनी लवकरात लवकर गजानन ऑटोमोबाईल्स प्रा. लि, सातारा यांच्या सातारा, कराड, फलटण,शिरवळ, दहिवडी, कोरेगाव येथील शाखांशी संपर्क साधून आपले वाहन खरेदी अथवा बुकिंग करून पाडव्याचे बंपर बक्षीस 100 सीसी मोटारसायकल जिंकण्याच्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन गजानन ऑटोमोबाईल्सचे डायरेक्टर सचिन शेळके व प्रवीण शेळके यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मोबा. 9673004003 क्रमांकावर संपर्क साधावा.