स्थैर्य, सातारा, दि. २८ : सातारा सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्वत्र शिक्षण क्षेत्रात विविध प्रयोग सुरु असताना खोजेवाडी (जि. सातारा) ग्रामपंचायतीने पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेजच्या सहकार्याने महाराष्ट्रातील पहिले डिजिटल नॉलेज व्हिलेज बनविण्याच्या एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन केले.डिजिटल नॉलेज व्हिलेज ह्या उपक्रमा अंतर्गत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्ञानवेद जिनियस हे मोबाईल अप गावातील महाराष्ट्र हायस्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्यातील विद्यार्थीना व गावातील सर्वांना उपलब्ध होणार आहे आणि ज्ञानवेद स्मार्ट स्कूल प्लाटफॉर्म शाळामध्ये राबवला जाणार आहे. ह्याच्या माध्यमातून गावातील शाळांचे संपूर्ण डीजीटलाजेशन होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना दररोज शाळेच्या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त अवांतर ज्ञान मिळणार आहे. त्यातून त्यांचा नॉलेज मॅप विकसित व्हायला खूप मदत मिळणार आहे. तसेच शालेय वयापासूनच त्यांची स्पर्धा परीक्षांची तयारी होणार आहे. तसेच सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी व सर्व ग्रामस्थांना हे एप उपलब्ध करून दिले जाते आहे. सर्व ग्रामस्थांना विश्वापासून आपल्या जिल्ह्यापर्यंत विविध विषयांची १५००० पेक्षा जास्त पानांची माहिती असलेला ज्ञानकोश ही उपलब्ध झाला आहे.
या अॅपच्या माध्यमातून आता ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थांशी क्षणात संपर्क ही साधू शकणार आहे. त्यामुळे गावात राबविल्या जाणाऱ्या योजना, वेळोवेळी घेतले जाणारे निर्णय आता खोजेवाडी तील ग्रामस्थ जगात कोठेही असला तरी त्याच्या पर्यंत पोहोचविणे ग्रामपंचायतीला एका क्लिक वर शक्य होणार आहे. तशी सिस्टीम त्यात विकसित केल्याचे सरपंच अरुणाताई जाधव यांनी सांगितले. यापूर्वी ग्रामपंचायतीने अनेक पुरस्कार मिळवले आहेत. त्यामध्ये स्मार्ट ग्राम योजनेचा तालुका स्तरावरचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार निर्मलग्राम पुरस्कार संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान मधील पुरस्कार तंटामुक्त अभियान पुरस्कार राज्यातील केवळ 45 दिवसात बांधून पूर्ण केलेले घरकुल योजनेत पुरस्कार घनकचरा व्यवस्थापन मधील पुरस्कार वृक्ष लागवडीमधील पुरस्कार तसेच पाणी आडवा पाणी जिरवा मनरेगा अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक कामे करून गावाने वेगळा आदर्श निर्माण केला आहे.डिजिटल व्हिलेज खोजेवाडी अंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये खूप फायदा होणार आहे स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदतच होणार आहे. याप्रसंगी खोजेवाडीच्या सरपंच अरुणा जाधव, उपसरपंच राहुल डांगे, ग्रामसेवक बापूसाहेब बोभाटे, ग्रामपंचायत सदस्य आणि बाळासाहेब घोरपडे विजयराव घोरपडे व ग्रामस्थ उपस्थित होते.