
दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२२ । मुंबई । द बॉडी शॉप या आंतरराष्ट्रीय पर्सनल केअर ब्रॅण्डने त्यांचा लोकप्रिय ‘द फिल गुड सेल’ची घोषणा केली आहे, ज्यामध्ये ब्रॅण्डच्या व्यापक श्रेणीमधील विविध उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स सादर करण्यात आल्या आहेत. हा सेल ३१ जुलै २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. पर्सनल केअरला अधिक प्राधान्य देणा-यांसाठी हा सेल अत्यंत अनुकूल असेल.
द फिल गुड सेल द बॉडी शॉपच्या निष्ठावान ग्राहकांना स्किनकेअर उत्पादने, बाथ व बॉडी आणि फ्रॅग्रॅन्सेसवर हा सेल जवळपास ५० टक्के सूट देतो. ग्राहकांना निवडक उत्पादनांवर प्रचंड ५० टक्के सूट देखील मिळेल, जसे ब्रॅण्डचे प्रख्यात आल्मंड मिल्क अॅण्ड हनी बॉडी बटर, सूथिंग आल्मंड मिल्क अॅण्ड हनी बिग गिफ्ट बॉक्स, फ्रेश न्यूड फाऊंडेशन हँड क्लीन्सिंग जेल रेंज, बॉडी मिस्ट्स आणि इतर अनेक.
द फिल गुड सेलमध्ये सर्वांसाठी काही-ना-काही आहे. उत्पादनांना वेगन सर्टिफिकेशन आहे, ते दोष-मुक्त आहेत आणि पुनर्चक्रणीय, स्थिर पॅकेजिंगसह येतात. हा व्यापक सेल द बॉडी शॉपच्या वेबसाइटवर (https://www.thebodyshop.in/), तसेच भारतभरातील त्यांच्या प्रत्यक्ष स्टोअर्समध्ये सुरू होईल.