किसनवीर च्या २१ उमेदवारांचे भवितव्य आज होणार पेटी बंद; १५५ मतदान केंद्रावर ५२ हजार ९० सभासद करणार मतदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०३ मे २०२२ । सातारा । राष्ट्रवादी आणि भाजप या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी दिनांक 3 रोजी मतदान होत आहे. पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या या कारखान्याची 52 हजार 90 सभासद 21 जागांसाठी 46 उमेदवारांचे भवितव्य पेटी बंद करणार आहे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने या निवडणुकीची तयारी केली असून कारखाना कार्यस्थळावर कड़क पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

किसनवीर सहकारी साखर साखर कारखान्याचा गाळप हंगाम व व किसनवीर कारखान्याची थकीत देणी या मुद्द्यांवरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विविध राजकीय नेतृत्वाच्या माध्यमातून कारखान्यांचा हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने हालचालींना सुरुवात केली होती कारखान्याचे कर्ज आश्वासक रित्या फेडण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती मात्र राज्य सहकारी निवडणूक आयोगाने हे विनंती अर्ज फेटाळून लावत थेट किसनवीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर केली .राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी बंधू सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या साथीने कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष माजी आमदार मदन भोसले यांच्या शेतकरी विकास आघाडीच्या विरोधात दंड थोपटले राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत सत्तेत आपणच येणार असल्याचा दावा केला पाच तालुक्यांची कार्यक्षेत्र असल्यामुळे सातारा कोरेगाव वाई खंडाळा व जावली तालुक्यातील राजकीय समीकरणांचे पडसाद प्रचार मोहिमेत उमटत राहिले आमदार शशिकांत शिंदे आमदार महेश शिंदे मदन भोसले आमदार मकरंद पाटील यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी मुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते.

दिनांक तीन मे रोजी 155 मतदान केंद्रावर सकाळी नऊ ते पाच या वेळेमध्ये कारखान्याचे 52090 ऊस उत्पादक शेतकरी आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे हे सभासद 21 जागांसाठी 46 उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय घेणार आहेत किसनवीर कारखान्याचे एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक होत असून यामध्ये व्यक्ती ऊस उत्पादक सभासद गटातून तीन ,वाई व जावळी येथून तीन, सातारा येथून तीन ,कोरेगाव येथून तीन असे पंधरा संचालक ,उत्पादक संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था व प्रतिनिधी गटातून एक, अनुसूचित जाती जमाती एक ,महिला राखीव दोन, इतर मागास प्रवर्ग राखीव एक ,विमुक्त जाती भटक्या जमाती एक , अशा 21 जागांवर संचालक निवडले जाणार आहेत.

वाई आणि कोरेगाव व खंडाळा या तीन तालुक्यांमध्ये सभासदांची संख्या जास्त असल्यामुळे या तीन तालुक्यात चा कौल किसनवीर साठी निर्णय ठरणार आहे ा तालुक्‍यातील 155 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दिनांक दिनांक पाच मे रोजी किसनवीर कारखाना साठी झालेल्या मतांची मोजणी होणार असून त्या दिवशी अंतिम निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!