दैनिक स्थैर्य | दि. २३ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील मठाचीवाडी येथे फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषीकन्यांनी मठाचीवाडी येथील शेतकर्यांना केळी या पिकातील मुनवे काढण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव औद्योगिकजोड प्रकल्प २०२३-२४ अंतर्गत मठाचीवाडी, तालुका फलटण येथील शेतकर्यांना उत्पादन वाढीसाठी केळी पिकातील मुनवे काढण्याची योग्य पद्धत व त्याचे महत्त्व प्रात्यक्षिकाद्वारे समजावले. केळी पिक हे ऊस पिकानंतर आर्थिक उत्पादनासाठी नगदी पीक म्हणून ओळखले जाते. मुख्य केळीच्या पिकाच्या शेजारील मुनवे धारदार विळ्याने कापल्याने व त्यावर रॉकेल मिश्रित द्रावण टाकल्याने मुनवे मरतात.त्यामुळे मुख्य पिकातील मुनवे तयार होऊन अन्नद्रव्य शोषणाची स्पर्धा होत असते, ती कमी होऊन मुख्य पिकाची सेंद्रिय व रासायनिक खते यांची गरज पूर्ण होते व त्यामुळे मुख्य केळी पिकाची वाढ चांगली वजनदार होऊन उत्पादनात वाढ होते, अशी महत्त्वपूर्ण माहिती कृषीकन्यांनी शेतकर्यांना दिली.
कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीकन्या समृद्धी मोहिते, साक्षी शिंदे, हर्षदा लोखंडे, प्राजक्ता ननवरे, पूजा मारवाडी, शिवांजली धुमाळ, समृद्धी कुंजीर, समृद्धी उल्हारे या कृषीकन्यांना या प्रात्यक्षिकासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नितिशा पंडित यांचे मार्गदर्शन लाभले.