
भारत कृषीप्रधान देश असून शेतकरी गरीब आहे. कर्जबाजारी, अशिक्षितपणा अशा शेतकऱ्यांना नवनविन कायदे करुन सरकारला काय साध्य करावयाचे आहे. आधीच महागाई, हमीभाव नाही, खाती तोंड व शेती तुकडे यांनी मेटाकुटीला आलेल्या शेतक-याला शेत मशागतीच्या वेळी स्वतः बैलाऐवजी जुंपून घ्यावे लागते. निघालेले अल्प (तीनशे-चारशे) किलो शेतमाल विकायला कुठे नेणार. भांडवलाचा अभाव, वहातूक खर्च आवक्याबाहेर यातच अल्पभूधारक शेतकरी भरडला जातोय.
अल्पभूधारक व मोठ्या शेतजमिनीवर शेती करणारा शेतकरी या दोघांना एकच कायदा लागू करता येणार नाही.देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वरीस झाली तरी सतरी पार केलेल्या शेतकऱ्यांना कष्ट करावे लागते.याचा ही विचार व्हावा.