दैनिक स्थैर्य । दि. १९ मार्च २०२२ । फलटण । विख्यात Fortune मॅगझिन हा 1929 पासून ओळखला जाणारा अमेरिका येथील मॅगझिन ब्रँड आहे. व्यवसाय विश्वातील सर्वात जास्त ओळखता येणारा आणि सन्मानित मॅगझिन आहे. Fortune India Exchange च्या मार्च 2022 च्या Titans of Indian Business शिर्षक असलेल्या या अंकामध्ये डॉक्टर बी. के. दीपक हरके याँच्या कार्याचीं दखल घेतली आहे.
मार्च 2020 मध्ये विख्यात फोर्ब्स इंडियाच्या Modern India’s Game Changers शिर्षक असलेल्या अंकामध्ये ही डॉ. बी. के. दीपक हरके याँच्या कार्याची दखल घेतली गेली होती.
प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी रतन मोहिनी जी यांना माऊंट आबू येथील आंतरराष्ट्रीय मुख्यालय येथे Fortune India Exchange चा अंक डॉ. बी. के. दीपक हरके व भारतीय नौदलाचे उपप्रमुख व्हाईस एडमिरल सतीश नामदेव घोरमडे यांनी भेट दिला.
१७४ विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक डॉ. दीपक हारके यांनी सर्वात मोठी रांगोळी, सर्वात मोठे शुभेच्छा पत्र, सर्वात मोठे वर्तमानपत्र, सर्वात मोठी पतंग, सर्वात मोठे पोस्ट कार्ड, सर्वात मोठे अंतर्देशीय पत्र, सर्वात मोठे पॅम्प्लेट, सर्वात मोठी ट्रॉफी, सर्वात मोठे पुस्तक, सर्वात मोठा वेडिंग बुके, सर्वात मोठे फुलांचे शिवलिंग, सर्वात छोटी राखी, सर्वात छोटे कमळ, सर्वात छोटे बॅडमिंटन रॅकेट, सर्वात मोठा गुलाबांचा गुच्छ या सारखे १७४ विश्वविक्रम करून भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल Fortune India Exchange मासिकाने घेतली आहे.
मागील 33 वर्षांपासून राजयोगाचा प्रसार व प्रचार केल्याबद्दल डॉक्टर बी के दीपक हारके यांना याआधी अभिनेत्री रवीना टंडन यांचे हस्ते “इंटरनॅशनल अचिएव्हमेन्ट अवॉर्ड” ने कलकत्ता येथे गौरविण्यात आले आहे. तसेच अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे हस्ते “इंटरनॅशनल ग्लोरी अवॉर्ड” ने गोआ येथे गौरविण्यात आले आहे.
तसेच अभिनेत्री बिपाशा बासु यांचे हस्ते “इंडिया एक्सलेन्स अवॉर्ड” ने बंगलोर येथे गौरविण्यात आले आहे. तसेच अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे हस्ते “इंडियन ग्लोरी अवॉर्ड” ने दिल्ली येथे गौरविण्यात आले आहे.
तसेच दिल्ली मध्ये अभिनेते विवेक ओबेरॉय यांचे शुभ हस्ते डॉ दीपक हारके यांना “इंडियन प्राईड अवॉर्ड” ने गौरविण्यात आले आहे
तसेच गोआ मध्ये अभिनेते सुनील शेट्टी यांचे शुभ हस्ते डॉ दीपक हारके यांना “इंडियास सिगनेचर ब्रँड अवॉर्ड” ने गौरविण्यात आले आहे.
तसेच केंद्रीय जल शक्ति मंत्री श्री रतनलाल कटारिया यांचे हस्ते दिल्ली येथे “भारत गौरव अवार्ड” ने गौरविण्यात आले आहे
तसेच बँकॉक येथे थाईलैंड च्या सुप्रसिद्ध उद्योजिका मारिसा फैंकवाम्फी तसेच नेशनल इंस्टिट्यूट फॉर एजुकेशन एंड रिसर्च चे डायरेक्टर जनरल डॉ अभिराम कुलश्रेष्ठ यांचे हस्ते “इंडिया थाई फ्रेंडशिप अवार्ड” ने गौरविण्यात आले आहे
तसेच लंडन येथील ब्रिटिश पार्लमेंट मधील हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये लॉर्ड बी पारेख, लॉर्ड रामी रेंजर तसेच अमृता देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते “भारत गौरव अवॉर्ड’ ने गौरविण्यात आले आहे. तसेच नेपाळचे पहिले उपराष्ट्रपति श्री रामानंद झा यांचे शुभ हस्ते पहिला ग्लोबल पीस अवार्ड देऊन काठमांडू येथे गौरविण्यात आले आहे.
तसेच सुप्रसिद्ध फिटनेस ट्रेनर मिकी मेहता यांचे हस्ते जूरीक, स्वित्झर्लंड येथे भारत गौरव सन्मानाने गौरविण्यात आले आहे.