कोयना धरण प्रवेशद्वारासाठी दोन कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर

कोयना धरणाच्या प्रवेशद्वाराला येणार शिवकालीन लूक


स्थैर्य, सातारा, दि.17 ऑक्टोबर : कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव शिवाजी सागर असल्याने त्याचे प्रवेशद्वार शिवकालीन धर्तीवर असावे अशी मागणी भाजपाचे पाटण तालुकाध्यक्ष नंदकुमार सुर्वे यांनी वेळोवेळी केली होती. ही मागणी विचारत घेऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कोयना धरण प्रवेशद्वारासाठी दोन कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे सुर्वे यांनी सांगितले आहे.

कोयना धरण हे महाराष्ट्राची भाग्यरेषा आहे. त्यातच सह्याद्रीच्या उशाशी असणार्‍या कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव ’शिवाजीसागर’ आहे. त्यामुळे या धरणाचे प्रवेशद्वार शिवकालीन आणि भव्यदिव्य असावे, अशी मागणी गेली तीन वर्षे पाटण तालुका भाजपाच्या वतीने होत होती. परंतु याकडे दुर्लक्ष होत होते.

 

अखेर राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी केल्यावर त्यांनी तातडीने प्रवेशद्वार शिवकालीन करण्याबाबत कृष्णा खोरे विकास महामंडळाला सूचना केल्या. परंतु आम्ही मागणी केलेला 50 लाख रुपयांचा निधी कमी पडत असल्याने त्याबाबत मंत्रालय स्तरावर मागणी करण्यात आली आणि अखेर यासाठी दोन कोटी 50 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. कामाची निविदा तातडीने काढून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

यासाठी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, पाटण तालुका भाजपा नेते सत्यजितसिंह पाटणकर,भाजपा युवा नेते याज्ञसेन पाटणकर, माजी सभापती राजाभाऊ शेलार यांनी मार्गदर्शन केले, तर बबनराव कांबळे, बाळासाहेब कदम, सत्यजित शेलार, धीरज कदम, अजिंक्य डवर, पंकज गुरव, बापू देवळेकर, रामभाऊ मोरे, संजय सावंत, संपत जाधव यांनी विशेष सहकार्य केले.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक गुणाले, मुख्य अभियंता कोयना प्रकल्प, अधीक्षक अभियंता नाईक व काटकर, कार्यकारी अभियंता पोतदार व रासनकर, उपअभियंता जाधव या सर्वांचे कोयना विभागाच्या वतीने आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!