वाईतील वाढत्या रुग्ण संख्येमुळे मंगळवार रात्री पासून संपूर्ण शहर प्रतिबंधित क्षेत्र

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, वाई, दि. २७: वाई शहरात वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहर मंगळवार रात्री पासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येणार आहे.

शहरात करोना उपाययोजनांच्या आढाव्यासाठी आमदार मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले,तहसीलदार रणजित भोसले, मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ ,नगराध्यक्षा डॉ प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, गट विकास अधिकारी उदयकुमार कसुरकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप यादव आदी उपस्थित होते

वाई शहरात दररोज दीडशे ते दोनशे रुग्ण नव्याने आढळून येत आहेत.शहरात भाजी, किराणा माल व औषधासाठी मिळणाऱ्या शिथिलतेचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर गर्दी करत आहेत.यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.शहरात सुक्ष्म लक्षणे असलेले ,उपचारानंतर घरी सोडलेले रुग्ण गृह विलीगी करणात आहेत. त्यातील काही रुग्ण बाहेर फिरत असल्याने रुग्ण वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात ४२ प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आल्याचे प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले यांनी सांगितले.मात्र त्याची कडक अंमलबजावणी होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.त्यावर ताबडतोबीने कार्यवाही करण्याची सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केली.मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवकांचा समन्वय ठेवावा.सर्व नगरसेविका नगरसेविकांच्या मदतीने व सहकार्याने करोना संसर्गाचा उपाययोजना शहरातील प्रतीबंधीत क्षेत्र यांचे नागरिकांना त्रास होणार नाही असे नियोजन करावे असे सुचविले. घरपोहोच साहित्य मिळण्याची व्यवस्था उभारण्यास प्राधान्य देण्यास सांगितले. नगराध्यक्ष डॉ प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत,चरण गायकवाड,दीपक ओसवाल,महेंद्र धनवे,राजेश गुरव,भारत खामकर, रुपाली वनारसे आदींनी यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेतला. या साथीच्या विरोधात लढण्यासाठी मोठी मदत शहरातून उभारली जाईल असे नगराध्यक्षा डॉ शिंदे यांनी सांगितले.यावेळी प्रदीप जायगुडे, युगल घाडगे,मामा देशमुख आदी उपस्थित होते

दरम्यान आमदार मकरंद पाटील यांच्या मध्यस्थी व समन्वयाच्या सूचने नंतर शहरात वाढत्या करोना संसर्गावर उपाययोजनां करण्यासाठी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष मुख्याधिकारी नगरसेवक नगरसेविका यांची बैठक झाली. मात्र बैठकीतील झालेल्या चर्चेचा तपशील मिळू शकला नाही.
कोट

वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांना करोना संसर्ग झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उभारलेली यंत्रणाही तोकडी पडताना दिसते आहे.तापोळा,महाबळेश्वर,डॉन अकॅडमी, बेल एअर हॉस्पिटल,वाई तील डॉ घोटवडेकर,डॉ बाबर,डॉ कद्दू, डॉ मेणबुधले, वाई ग्रामीण रुग्णालय खंडाळा तालुक्यातही शासकीय व खाजगी ठिकाणी उपचार सुरु आहेत.रुग्णालये अधिग्रहित केली असून यंत्रणा उभारली आहे.वाईतील किसन वीर महाविद्यालयात विलीगीकरण कक्ष सुरु झाला आहे. कवठे उपकेंद्र व मॅप्रो आय हॉस्पिटल मधील यंत्रणा पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे.ते एक दोन दिवसात पूर्ण होईल.त्यामुळे आपल्या भागात अतिदक्षता विभाग,प्राणवायू खाटा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील.येथील प्राणवायू पुरवठा सुरळीत व नियमित राहण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे.मुख्य म्हणजे यासाठी डॉक्टर,परिचारिका,सेवक ,तंत्रज्ञ यांची उपलब्धता करण्यात आली असून आता मतदारसंघातच उपचारासाठी प्रयत्न केले जात आहेत.

– मकरंद पाटील,आमदार,वाई खंडाळा महाबळेश्वर


Back to top button
Don`t copy text!