स्थैर्य, अहमदाबाद, दि.२५: टीम इंडियाने इंग्लंडविरोधात डे-नाइट टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी उत्कृष्ट कामगिरी केली. जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्या इनिंगमध्ये 112 धावा केल्या होत्या. यानंतर भारताने पहिल्या इनिंगमध्ये 145 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लिश टीम दुसऱ्या इनिंगमध्ये 81 धावांवर ऑल आउट झाली. आता टीम इंडियाला विजयासाठी 49 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
दुसरी इनिंगमध्ये इंग्लंडसाठी बेन स्टोक्सने सर्वाधिक 25 आणि कर्णधार जो रूटने 19 धावा केल्या. टीम इंडियाचा स्पिनर अक्षर पटेलने 5 आणि रविचंद्रन अश्विनने 4 विकेट घेतल्या. एक विकेट वॉशिंग्टन सुंदरला मिळाली.
इंग्लंडने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट गमावल्या
दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडची अतिशय खराब सुरुवात झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये स्पिनर अक्षर पटेलने जॅक क्राउली आणि जॉनी बेयरस्टोला क्लीन बोल्ड केले. यानंतर अक्षरने टीमला 19 धावांवर तिसरा झटका दिला. डॉम सिबनी 7 रन काढून विकेटकीपर ऋषभ पंतकडे झेलबाद झाला.
यानंतर 50 धावांवर इंग्लंडला चौथा झटका बसला. भारतीय स्पिनर रविचंद्रन अश्विनने बेन स्टोक्सला 25 रनावर LBW केले. अश्विनने करिअरमध्ये 11 व्यांदा स्टोक्सला आउट केले. यानंतर अक्षरने कर्णधार जो रूटला 19 रनावर LBW केले. हा इंग्लंड टीमला 56 रनावर 5वा झटका होता.
अश्विनच्या नावे सर्वात जलद 400 टेस्ट विकेट घेण्याचा विक्रम
भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या इनिंगमध्ये तिसरी विकेट घेऊन 77 व्या टेस्टमध्ये 400 विकेट घेण्याचा विक्रम केला. अश्विन जगात सर्वात वेगवान 400 विकेट घेण्याच्या यादीत श्रीलंकेच्या मुथैया मुरलीधरननंतर दुसऱ्या नंबरवर आहे. मुरलीधरनने 72 व्या टेस्टमध्ये 400 विकेट घेतल्या होत्या. शिवाय, सर्वात जलद 400 विकेटपर्यंत जाण्याचा भारतीय रेकॉर्ड अनिल कुंबळेचा नावे होता. कुंबळेने 85 व्या टेस्टमध्ये 400 विकेट पूर्ण केल्या होत्या.
अक्षर एक डे-नाइट टेस्टमध्ये सर्वाधिक 11 विकेट घेणारा बॉलर
अक्षर पटेल एक डे-नाइट टेस्ट (दोन्ही इनिंग)मध्ये सर्वाधिक 11 विकेट घेणारा जगातील पहिला गोलंदाज बनला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिंस आणि वेस्टइंडीजच्या देवेंद्र बीशूने 10-10 विकेट घेतल्या आहेत.
इंग्लंडकडून लीचने 4 आणि रूटने 5 विकेट घेतल्या
टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्माने 96 बॉलमध्ये 66 धावा केल्या. रोहितशिवाय विराट कोहलीने 27 धावा केल्या. इंग्लंडकडून स्पिनर जॅक लीचने 4 आणि जो रूटने 5 विकेट घेतल्या.
भारताची दुसऱ्या दिवशी खराब सुरुवात
टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी 3 विकेटवर 99 रनांपासून खेळणे सुरू केले होते. टीमने 18 धावा केल्यानंतर अजिंक्य रहाणे (7 रन), रोहित शर्मा (66 रन) आणि ऋषभ पंत (1) आउट झाले. जॅक लीचने रहाणे आणि रोहितला LBW केले. यानंतर कर्णधार जो रूटने ऋषभ पंतला कॅच आउट केले.
रोहित-कोहलीने संघाला सांभाळले
पहिल्या दिवशी टीम इंडियाने सलग दोन ओव्हरमध्ये (15वी आणि 16वी) 2 विकेट गमावल्या. ओपनर शुभमन गिल 11 धावांवर जोफ्रा आर्चरच्या बॉलवर आउट झाला. यानंतर चेतेश्वर पुजाराला जॅक लीचने शून्यावर आउट केले. यानंतर ओपनर रोहित शर्माने एक बाजू भक्कमपणे सांभाळत विराट कोहलीसोबत 64 धावांची पार्टनरशिप केली. पहिल्या दिवसाखेर कोहली 27 धावांवर आउट झाला.
इंग्लंडची पहिल्या इनिंगमध्ये खराब सुरुवात
इंग्लंडची सुरुवात खराब झाली. इंग्लिश टीमच्या दोन विकेट 27 धावांवर पडल्या. 100वा कसोटी खेळणाऱ्या इशांत शर्माने इंग्लंडला पहिला झटका दिला. ओपनर डॉम सिबली 1 रन काढून इशांतच्या बॉलवर स्लिपमध्ये रोहित शर्माकडे झेलबाद झाला.
अक्षरने पहिल्या इनिंगमध्ये 6 विकेट घेतल्या
स्पिनर अक्षर पटेलने 6 विकेट घेऊन इंग्लंडला मोठा धक्का दिला. पटेलने 7 व्या ओव्हरमध्ये इंग्लिश टीमची दुसरी विकेट घेतली. जॉनी बेयरस्टोला LBW केले. यानंतर अक्षरने जॅक क्राउलीला 53 रनांवर LBW केले. क्राउलीने करिअरमधील चौथे अर्धशतक लगावले. यानंतर पटेलने बेन स्टोक्स (6) लाही LBW केले. यानंतर अक्षरने जोफ्रा आर्चर आणि शेवटी स्टुअर्ट ब्रॉडला आउट केले.
अश्विनने पहिल्या इनिंगमध्ये 3 विकेट घेतल्या
स्पिनर रविचंद्रन अश्विनने 3 विकेट घेतल्या. अश्विनने इंग्लिश टीमला दुसरा झटका देताना कर्णधार जो रूटला 17 रनांवर LBW केले. यानंतर अश्विनने ओली पोप (1 रन) आणि जॅक लीचला आउट केले.
दोन्ही संघ:
इंडिया: रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह.
इंग्लंड: डॉम सिबली, जैक क्राउली, जॉनी बेयरस्टो, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स (विकेटकीपर), जोफ्रा आर्चर, जैक लीच, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स एंडरसन.