
स्थैर्य, 15 जानेवारी, सातारा : मेढा-महाबळेश्वर रस्त्यावर केळघरनजीक असलेला 150 वर्षे जुना रामजीबाबा पूल अखेर बुधवारी इतिहासजमा झाला आहे. ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या या पुलाची अवस्था जीर्ण झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तो वापरातून काढण्याचा निर्णय घेतला. सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती..
केळघर परिसरातील हा पूल अनेक वर्षे मेढा अन महाबळेश्वर मार्गावरील महत्त्वाचा दुवा होता. मात्र वाढलेली वाहतूक, नैसर्गिक झीज अन पुलाच्या मजबुतीवरनिर्माण झालेले प्रश्न लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला.
पूल बंद झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्यांवरुन वळवण्यात आलीदरम्यान, याच ठिकाणी नवीन पूल उभारण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. नवीन पुलाचे आराखडे अन आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया प्रगत टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली. नवीन पूल उभारेपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नवीन पुलाचे भूमिपूजन नुकतेच महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्रीशिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते पार पडले होते. या कामासाठी स सातारा जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी वेळोवेळी स पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे आजच्या कारवाईतून दिसून आले.आंबेघर परिसरातील हा पूल अनेक वर्षे मेढा अन महाबळेश्वर मार्गावरील महत्त्वाचा दुवा होता. ऐतिहासिक वारसा असलेल्या पुलाचा शेवट झाला असला तरी नवीन पुलामुळे वाहतूक सुरक्षित अन सुलभ झाली आहे.

