दैनिक स्थैर्य । दि. १३ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सातारा शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे या उपायोजनांचा भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोटिशीनंतर येथील पारंगे चौकातील टपरी चालकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले यामुळे पारंगे चौकाकडून एसटी स्टँड आणि वाढ फाट्याच्या दिशेने जाणारा रस्ता आता मोठा झाला आहे.
पारंगे चौकातील अतिक्रमणांमुळे येथे अपघाताचा धोका वाढला होता सातारा लोणंद रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यापासून पोवई नाका ते वाढे फाटा येथील रस्त्यांवरील अतिक्रमणांना सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीसा पाठवल्या होत्या या नोटिसांची अंमलबजावणी तीन आठवड्यापूर्वीच करण्यात आली होती मात्र अंमलबजावणीचे काम सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागावर सोपवण्यात आले होते. पारंगे चौकातील टपरी चालकांना नोटीस प्राप्त होतात त्यांनी शनिवारी स्वतःहून पत्र्याचे शेडचे अतिक्रमणे काढून घेतली त्यामुळे वाहतुकीसाठी येथील पंधरा फूट रस्ता खुला झाला आहे.
फलटण पंढरपूर येथून येणाऱ्या पारंगे चौकातील एसटींसाठी हे वळण अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे येथील कोंडी कमी होणे गरजेचे होते त्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाने आपले प्रयत्न सुरू ठेवत वाहतुकीची कोंडी कमी केली आहे पारंगे चौक ते सातारा एसटी स्टँड येथे अतिक्रमणांवर सुद्धा तात्काळ मार्ग निघावा अशी अपेक्षा व्यक्त आहे पारंगे चौकातील टपरी चालकांनी आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात व्यवसायासाठी जागा मिळावी अशी मागणी केली आहे.