ग्रामीण भागात सुद्धा एकही मतदार वंचित राहू देवू नका; प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे आदेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 19 डिसेंबर 2023 | गोखळी | केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २५५ फलटण विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्ययावतीकरण गावातील नाव नोंदणी पासून एकही मतदार वंचित राहणार नाही याची काळजी मतदार यादी नोंदणी अधिकाऱ्यांनी घ्यावी; असे आदेश फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिले.

फलटण विधानसभा मतदार संघातील मतदार यादी अद्ययावतीकरणाचे कामाचा आढावा घेण्यासाठी गोखळी येथे धावती भेट दिली.

दि. १ जानेवारी २०२४ पर्यंत ज्यांची वयाची १८ वर्ष पूर्ण झाली आहेत; अशा युवक/ युवती, तृतीय पंथी, नवविवाहिताच्या नावांचा समावेश, मयत आणि स्थलांतरिताची नावे वगळणे; कामे काळजीपूर्वक करावीत. यासोबतच मतदार यादी अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन प्रांताधिकारी सचिन ढोले विविध निर्देश दिले.

प्रांताधिकारी सचिन ढोले यांचा गोखळी ग्रामस्थांच्या वतीने जेष्ठ पत्रकार राजेंद्र भागवत यांचे हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी उपसरपंच अभिजीत जगताप, अक्षय कोठावळे, गोखळीचे पोलिस पाटील विकास शिंदे, खटकेवस्तीचे पोलिस पाटील राजेंद्र धुमाळ यांचा “पोलिस पाटील ” दिनाच्या निमित्ताने आठवण करून दोन्ही पोलिस पाटलांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले.


Back to top button
Don`t copy text!