
दैनिक स्थैर्य | दि. 20 एप्रिल 2025 | फलटण | फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर पतसंस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली असून यानंतर सर्व उपस्थित संचालका मधून चेअरमन पदी सुनील खरात व व्हॉइस चेअरमन पदी कविता सस्ते यांची निवड झाली.
चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदाच्या आयोजित निवड बैठकीत नवनिर्वाचीत संचालका मधून चेअरमन पदाच्या व व्हॉइस चेअरमन पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी प्रशालेचे प्राचार्य संजय वेदपाठक,संचालक प्राचार्य सागर दत्तात्रय निंबाळकर, राहुल वसंतराव भोसले, राजेंद्र दशरथ कदम, प्राचार्य अमोल विलास सावंत, मनोज अशोकराव कदम,प्राचार्य जालिंदर सोपान माने, उत्तम जगन्नाथ घोरपडे, , सुजित बाळासाहेब जाधव, सोमनाथ श्रीकांत माने, अमित अरविंद कदम, हरिभाऊ रामचंद्र मोरे, प्राचार्य मिनल सुनील दिक्षित, माधुरी विजय पवार हे संचालक व उपप्राचार्य बाळकृष्ण काळे,सचिव संजय निंबाळकर, किशोर मांढरे उपस्थित होते.
चेअरमन पदी सुनील खरात व व्हॉइस चेअरमन पदी कविता सस्ते यांच्या निवडीबाबत महाराष्ट्र राज्याचे माजी सभापती व विद्यमान विधान परिषद सदस्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासनाधिकारी अरविंद निकम, प्राचार्य संजय वेदपाठक, उपप्राचार्य बाळकृष्ण काळे यांनी चेअरमन सुनील खरात व व्हॉइस चेअरमन कविता सस्ते यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.