वापसा येईना पेरणीचं ग्रहण सुटेना..शेतकरी संभ्रमात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, वावरहिरे (अनिल अवघडे) दि. ३१ : माणच्या माथी कायम दुष्काळ बडवलेला.दुष्काळासोबतच शेती आणि शेतकर्‍याचेही मन अक्षरशः होरपळुन गेले होते.परंतु माण मध्ये मागील दोन- तीन वर्षात झालेल्या जलसंधारणाच्या कामाने या दुष्काळी पट्ट्यात शेतीत अमुलाग्र बदल घडत असल्याने चिञ बदलते होते.परंतु यंदा परतीच्या पावसाने या दुष्काळी भागात हाहाकार माजवला. कायम संकटाचे घाव सोसणारा बळीराजा देशोधडीला लागला.आदिच कर्जबाजारी झालेला बळीराजा,दागदागिणे गहाण,सातत्याने व्यापारी वर्गाकडुन होत असलेली लुट या सर्व कारणानी दयनिय स्थितीत असतानाच अतिवृष्टीने आख्खा खरिप उद्ध्वस्त केल्याने अतिशय बिकट अवस्था झाली.हंगामाच्या शेवटी अतिवृष्टी झाल्याने हातातोंडाशी आलेलं पिक परतीच्या पावसाने हिरावल्याने बळिराजा आस्मानी संकटापुढे पुन्हा हतबल झाला. कांदा,बाजरी,मका ,घेवडा व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले.खरिप पिकांचे झालेले नुकसान व शेतीची बिघाडलेली गणिते सुधारण्यासाठी पुन्हा मोठ्या आशेने रब्बीच्या भरोश्यावर अवलंबुन राहिला .परंतु15 ते 31 आॅक्टोबर या कालाबधीत रब्बीची पेरणी होणे गरजेचे होते. पाऊस बंद होवुन पंधरा दिवस झाले. परंतु शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वापसा होत नसल्याने रब्बी पेरणी कशी होणार ? या चिंतेत बळीराजा सापडला.पावसामुळे खरीप वाया गेला आणि उशीरा पेरणीमुळे रब्बी हंगामाही हातचा जाण्याच्या भितीने बळीराजा धास्तावला आहे.अतिवृष्टीने अनेक छोट्या मोठ्या ताली व बांध फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले.त्यामुळे शेत व्यवस्थित करण्यासाठी आणि रब्बीच्या पेरणीसाठी खत बिबियाणे घेण्यासाठी शेतकर्‍यांकडे पैसेच शिल्लक राहिले नाहित. तर परतीच्या तडाख्याने अद्याप अनेक ठिकाणी पंचनामेच झालेले नाहीत.शासनाने हेक्टरी 10हजार रुपयांची मदत जाहिर केली परंतु ती कधी मिळणार? या पैश्यातुन पेरणी होणार का?या द्विधावस्थेत बळीराजा सापडला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!