क्षयरोगमुक्त भारताचे स्वप्न

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी


क्षयमुक्त भारत हे केवळ एक उद्दिष्ट नसून ते एक जनआंदोलन बनले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे २४ मार्च हा दिवस जगभरात ‘जागतिक क्षयरोग दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. या निमित्ताने जागतिक स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा’ची प्रभावी अंमलबजावणी आता राज्य आणि जिल्हास्तरावर अधिक सूक्ष्मपणे होत आहे. केवळ उपचारच नव्हे, तर रुग्ण शोधमोहीम आणि त्यांच्या आरोग्यावरील देखरेख यावर आरोग्य विभागाने कंबर कसली असून, या मोहिमेचा सविस्तर आढावा घेणारा हा विशेष लेख…
क्षयरोग हा सुक्ष्मजंतू मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस मुळे होतो. जेव्हा फुप्फुसाचा एखादा क्षयरुग्ण खोकतो किंवा शिंकतो यावेळी क्षयरुग्णाच्या तोंडातून सुक्ष्म थेंब (droplet) बाहेर पडतात व या सुक्ष्मथेंबामध्ये हे क्षयरोगाचे जंतू असतात. हे सुक्ष्म थेंब हवेत बराच वेळ तरंगत असतात व ज्यावेळी निरोगी व्यक्ति ही हवा नाकाद्वारे आत घेतो. त्यावेळी श्वासातून क्षयरोगाचा जंतू त्या व्यक्तिच्या शरीरात जातो व त्यास क्षयरोगाचा संसर्ग होतो.
सातारा जिल्ह्याची सध्याची लोकसंख्या साधारणत ३२ लाखापेक्षा जास्त आहे. दरवर्षी साातारा जिल्ह्यामध्ये ३ हजारांपेक्षा जास्त क्षयरुग्णांना उपचार दिला जातो. यापैकी १ हजार ४०० पेक्षा जास्त क्षयरुग्ण हे नविन थुंकीदुषित असतात व उरलेले थुंकीअदुषित असतात. नवीन क्षयरुग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण ८५ ते ९०% दरम्यान आहे. क्षयरोग हा हवेतून पसरणारा आजार असल्याने या आजाराचे जंतू कोणाच्याही शरीरात प्रवेश करु शकतात व क्षयरोग होऊ शकतो.
फुप्फुसाचा क्षयरोग व फुप्फुसाव्यतिरिक्त क्षयरोगक्षयरोगाचे प्रामुख्याने दोन प्रकारात वर्गीकरण होते. दोन आठवडयांपेक्षा जास्त काळ खोकला, हलकासा परंतु सायंकाळी वाढणारा ताप (हाड्या ताप), भूक मंदावणे, छातीत दुखणे, काही गंभीर क्षयरुग्णांच्या बेडक्यातून रक्त पडते व वजन कमी होणे फुफुसाच्या क्षयरोगाची लक्षणे आहेत. तसेच एच.आय.व्ही बाधीत किंवा मधुमेही रुग्णांमध्ये एक दिवसाचा खोकला देखील क्षयरोगाचा असू शकतो.
गंडमाळा (लसिका ग्रंथी) मानेवर सुज व गाठी येतात कधीकधी यामधून पू बाहेर येतो. मेंदूच्या आवरणाचा क्षयरोग (मेनिनजायटीस) डोकेदुखी, ताप, ग्लानी, मानेचा ताठपणा इत्यादी फुप्फुसाव्यतिरिक्त क्षयरोगाची लक्षणे आहे.
मणक्याचा क्षयरोग :- क्षयरोगाचे निदान मान्यताप्राप्त सुक्ष्मदर्शक केंद्रामध्ये (डीएमसी) बेडका तपासणी करणे हे क्षयरोग तपासणीचे प्रमुख साधन आहे. दोन आठवडयांपेक्षा जास्त काळ खोकला असल्यास नजीकच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात बेडका नमुना घेण्याची व्यवस्था आहे. सातारा जिल्ह्यात ६२ ठिकाणी सुक्ष्मदर्शक केंद्र आहेत.
नवीन सापडलेला स्यूटम पॉझिटिव्ह रुग्णाचे बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के पेक्षा जास्त साध्य करणे. अपेक्षित स्युटम पॉझिटिव्ह रुग्णांपैकी किमान ९० टक्के शोधून त्याची नोंद करणे.क्षयरोग उपचार पध्दत आपले नजिकच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध आहे. जर रुग्णास प्रथमच क्षयरोगाची बाधा झाली असेल तर अशा क्षय रुग्णास क्षयरोग उपचार सुरु केला जातो नवीन थुंकीदुषि, नविन चुंकीदुषित (एक्स रे दुषित), नविन फुप्फुसाव्यतिरिक्त क्षयरोग इत्यादी क्षयरुग्णांना ६ महिन्यंचा निरिक्षणाखाली उपचार दिला जातो हे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाची उद्दीष्टे आहे.
क्षयरोगाचा उपचार घेणा-या सर्व क्षयरुग्णांची एचआयव्ही तपासणी करणेत येते. क्षयरुग्ण एचआयव्ही बाधित असल्यास त्यास एआरटी सेंटरकडे उपचारासाठी पाठविले जाते व रुग्णास एचआयव्ही व क्षयरोगाची औषधे सुरु ठेवण्यात येते एचआयव्ही बाधित रुग्णाचा क्षयरोग पूर्ण बरा होतो. क्षयरोगाचा उपचार घेणा-या सर्व क्षयरुग्णांची मधुमेहासाठी तपासणी करण्यात येते क्षयरुग्णास मधुमेह असल्यास त्यास NCD सेंटरकडे उपचारासाठी पाठविले जाते व रुग्णास मधुमेह व क्षयरोगाची औषधे सुरु ठेवण्यात येते मधुमेह बाधित रुग्णाचा क्षयरोग पूर्ण बरा होतो.
क्षयरुग्णांनी मुळात क्षयरोग झाला म्हणून घाबरु नका हा आजार सरकारी दवाखान्यात ६ ते ९ महिन्यांच्या उपचाराने बरा होतो. हा उपचार पूर्ण मोफत उपलब्ध आहे.
प्रत्येक रुग्णासाठी ६ ते ९ महिन्यांचे पूर्ण औषधांचे बॉक्स एकदाच तयार करुन ठेवलेले असते त्या मुळे औषधोपचार अखंडीत सुरु राहतो. खोकताना किंवा शिंकताना तोडावर आठवणीने रुमाल धरावा. इतरत्र कोठेही थुंकु नये त्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो. सुरु असणारा औषधोपचार पूर्ण करा, मध्येच धरसोड केल्यामुळे जंतु औषधांना दाद देत नाही ही बाब लक्षात ठेवा.
संकलन जिल्हा माहिती कार्यालय, सातारा


Back to top button
Don`t copy text!