
दैनिक स्थैर्य । दि. २३ फेब्रुवारी २०२२ । फलटण । कोरोनाच्या व ओबीसी आरक्षणाच्या प्राश्वभुमीवर प्रलंबित राहिलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्यानुसार फलटण नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना दि. १० मार्च रोजी जिल्हाधिकार्यांच्या मार्फत प्रकाशित होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ०२ मार्च पर्यंत फलटण नगरपरिषदेसह राज्यातील “ब” वर्ग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे शहराची प्रभाग रचना ही जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणार आहेत. त्यानंतर दि. ०७ मार्च पर्यंत जिल्हाधिकारी सदरील प्रभाग रचनेस मान्यता देणार आहेत. दि. १० मार्च रोजी प्रारूप प्रभाग रचना व नकाशे रहिवाश्यांच्या माहितीसाठी व हरकतीसाठी प्रकाशित करण्यात येणार आहे.
दि. १० मार्च ते दि. १७ मार्च पर्यंत स्थानिक रहिवाश्यांना प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सुचना नोंदवण्यात येणार आहे. दाखल झालेल्या हरकती व सुचनांवर दि. २२ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सुनावणी होणार आहे.
दि. २५ मार्च पर्यंत दाखल झालेल्या हरकती व सुचनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करावयाचा आहे. तर त्यावर दि. ०१ एप्रिल पर्यंत “ब” वर्ग नगरपरिषदांच्या अंतिम प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयुक्त मान्यता देणार आहेत.