दैनिक स्थैर्य । दि.१७ फेब्रुवारी २०२१ । फलटण । तरडगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकीत राजे गट पुरस्कृत ग्रामदैवत भैरवनाथ पॅनलचे सर्व १३ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून सोसायटीवरील राजे गटाचे वर्चस्व अधिक मजबुत झाले आहे.
या निवडणूकीत ११६८ सभासदांनी मतदान केले त्यापैकी १०८५ वैध आणि ८३ मते अवैध ठरली, राजे गट पुरस्कृत भैरवनाथ पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात खालीलप्रमाणे –
सर्वसाधारण मतदार संघ : किसन गेनबा गायकवाड (५८७), लक्ष्मण परमेश्वर गायकवाड (६०७), विजय संपत गायकवाड (५०५), संतोष यशवंत पवार (६६४), दशरथ घमाजी बनकर (६५७), महावीर प्रफुल्लकुमार शहा (६८३), वसंत शंकर शिंदे (६४९), मधुकर सदाशिव सुळ (६२८).
महिला राखीव मतदार संघ : श्रीमती मधुमती सुरेश खलाटे (६७७), सौ. विजया पांडुरंग शिंदे (६२२).
अनुसूचीत जाती जमाती राखीव मतदार संघ : गोविंद एकनाथ गायकवाड (६४५).
विमुक्त जाती भटक्या जमाती राखीव मतदार संघ : पांडुरंग नबाजी कुलाळ (६६५).
इतर मागास वर्ग राखीव मतदार संघ : मोहन गंगाराम अडसूळ (६७२).
महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती वसंतराव गायकवाड, विद्यमान पंचायत समिती सदस्या सौ. विमलताई वसंतराव गायकवाड, सरपंच सौ. जयश्री अनिल चव्हाण यांच्या सह अनेकांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था फलटण सुनिल धायगुडे यांनी काम पाहिले.