दैनिक स्थैर्य । दि. ०६ सप्टेंबर २०२२ । फलटण । “शिक्षक दिनाच्या” औचित्य साधून व माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांच्या प्रेरणेने जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी तालुका फलटण आयोजित आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण फलटण येथील महाराजा मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
याप्रसंगी जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीचे अध्यक्ष श्री सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम (भैय्यासाहेब) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, फलटण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शाहीन पठाण यांच्या प्रमुख उपस्थिती हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्राथमिक विभागाचे विकास गोडसे ,सुलभा सस्ते, भोलचंद बरकडे, महादेव गायकवाड, कृष्णात कुंभार ,नंदा वाणी, राजेंद्र निगडे ,भगवान खताळ ,श्रीधर झोडगे, राजश्री बोबडे ,तुकाराम चव्हाण, सुधीर धालपे, सुनील तिवाटणे, सुनंदा काळभोर ,विठ्ठल सोनवलकर, सुनीता सस्ते, मेघा यादव ,संगीता शिंदे ,रसिका शिंदे, यशवंत जगताप ,अनंत काळे, संतोष निंबाळकर ,संतोष लंंभाते ,मनीषा नेवसे,शर्मिला फरांदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याबरोबरच माध्यमिक विभागाचे हरिभाऊ भुजबळ ,राजेंद्र शिंदे ,शुभांगी भोसले ,नारायण नाळे, निर्मला मोरे ,सत्यवान मोहिते, सुहास निकाळजे, गोरख कुंभार, संपत आडके ,बाळू शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे या कार्यक्रम प्रसंगी दत्तात्रय मेटे भगवान खवळे भरत अहिवळे दत्तात्रय मेटे हरिभाऊ भुजबळ मोहन भिसे हरिभाऊ अभंग लक्ष्मण रणवरे आदींसह जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी संचलित सर्व शाखांचे मुख्याध्यापक उपशिक्षक कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक होळकर सर यांनी मानले तर आभार फडतरे सर यांनी मानले.