
दैनिक स्थैर्य | दि. 26 जुलै 2025 । सातारा । ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी सातारा येथे पत्रकारांशी संवाद साधताना विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासंदर्भात महत्त्वाचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, “महाराज साहेबांना सर्व अधिकाऱ्यांची मी बहाल केले आहे. त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना त्रास होऊ नये, यासाठी योग्य व्यवस्था आम्ही करू.” या वक्तव्यानंतर हा राजकीय संवाद चर्चेचा विषय ठरला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटणच्या कोळकी येथील जाहीर सभेत स्पष्ट केलं होतं की, “जयकुमार गोरेंशी कोणताही वैयक्तिक वाद नाही, त्यांनी गोरगरीब जनतेची कामे अधिकाधिक करावीत,” असे त्यांनी सल्ला दिला. त्यांनी असेही सांगितले की, “मी माझ्या तोंडावर सेंसॉरशिप लावली आहे; योग्य वेळी ती काढेन.”
त्याआधी, मंत्री जयकुमार गोरे यांनी फलटण येथील बाजार समितीतील गाळेधारकरांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या कार्यक्रमात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली होती.