वडूज-डाळमोडी रस्त्यावर नवीन वृक्ष लागवड व वर्धापन दिन साजरा करताना मान्यवर व युवक (छाया : समीर तांबोळी ) |
स्थैर्य, कातरखटाव, दि. १६ : सामाजिक, राजकीय द्वेषापोटी गावोगावी मतभेदाच्या भिंती तयार झाल्या आहेत. याची लागन मोठ्या शहरापेक्षा ग्रामीण खेड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. या मत व मनभेदाच्या भितीं तोडून गावामध्ये एकीचे वातावरण निर्माण करण्याबरोबर परिसरात निसर्गाचे चांगले संतुलन राखण्याचा संकल्प खटाव तालुक्यातील डाळमोडी येथील शेकडो युवकांनी केला आहे.
दोन वर्षापूर्वी डाळमोडी गावामध्ये किरण निकम, अजित माने आणि सचिन घाडगे या तरुणांनी वृक्षारोपनाचे बीज पेरले. या तीन तरुणांनी एकत्र येवून राजकरण बाजूला ठेऊन गावातल्या सर्व तरुणांना एकत्र केले व वृक्षारोपणाच काम हाती घेतले. मागच्या वर्षी व या वर्षी मिळून 110 झाडांच वृक्षारोपणाच व वृक्षसंवर्धनाच काम या तरुणांनी स्वखर्चातुन चालु केले आहे. झाडांना पाणी देण्यासाठी गावातील आकाश पाटोळे व अमोल पाटील हे स्वतःचा टँकर व ट्रॅक्टर विनामूल्य देत आहेत. नोकरी निमित्त बारामती येथे असणारे डॉ. एच. एस. पाटील सर, हरिदास चौधरी, संतोष माने गावातील तरुणांना वृक्षसंवर्धनासाठी लागेल ती मदत करत आहेत. आता पर्यंत या टिम ने 30,000 पर्यंत खर्च केला आहे. गावामधील वणिकरणात या टिम ने मोठ्या होणार्या वृक्षांच्या 3000 बियांची लागवड केली आहे. निसर्गासाठी, मुक्या पशुपक्षांसाठी चाललेला हा एक लढा आहे. नुकताच वृक्षरोपनाचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे, माजी सरपंच विष्णुपंत निकम, राजेश निकम, बाबा शिंदे, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष धनंजय क्षिरसागर उपस्थित होते. या कामासाठी पूर्ण वर्षभर झाडांची निगा राखण्यासाठी अजित चौधरी, अक्षय चौधरी, भूषण घाडगे, गजानन निकम , प्रमोद पाटोळे, आकाश चौधरी, नानासाहेब चौधरी, रूपेश माने, सुभाष चौधरी, विठ्ठल चौधरी, श्रीकांत निकम, विशाल चौधरी, अनिकेत चौधरी, योगेश माने, सुशांत चौधरी, पवन चौधरी, सुशांत खोडसे, ॐकार चौधरी, भरत चौधरी, महेश पाटोळे, काकासो पाटोळे, विशाल निकम, सौरभ घाडगे, सागर घाडगे, लक्ष्मण शिंदे, किरण निकम, सुमित निकम, आन्ना रायते, अर्जुन शिबे, सागर शिबे, शुभम चौधरी, तुषार माने, बबन देशमुख, गणेश चौधरी, निखिल निगडे, यशवंत जाधव, अक्षय शिबे यांचा सिंहाचा वाटा आहे.