दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्र्यांनी घेतली सांत्वनपर भेट


दैनिक स्थैर्य । दि.१८ जानेवारी २०२२ । कोल्हापूर । उत्तर विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही दिवंगत आमदार जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

याप्रसंगी पालकमंत्री सतेज पाटील ,जयश्री जाधव, बंधू संभाजी जाधव, पुत्र सत्यजीत चंद्रकांत जाधव यांच्यासह जाधव कुटुंबियातील इतर सदस्य उपस्थित होते .


Back to top button
Don`t copy text!