स्थैर्य, सातारा दि. 16 : सातारा जिल्हयात सन 2020-21 मध्ये बियाणे खते व किटकनाशके या निविष्ठांच्या गुणवत्ता तपासण्यासाठी मे 2020अखेर बियाणे लक्षांक 218 असुन साध्य 144 असुन टक्केवारी 66.06 इतकी आहे खते लक्षांक 118 असुन साध्य 121 असुन एकुण टक्केवारी 102.54 इतकी आहे तसेच किटकनाशके लक्षांक 10 असुन साध्य 27 असुन एकुण टक्केवारी 270 इतकी आहे.
सन 2020-21 कृषि सेवा केंद्र तपासणी मोहिम अंतर्गत सातारा जिल्हयात कृषि निविष्ठा विक्री केंद्राची राज्य शासन कृषि विभाग मार्फत 226 व जि.प. कृषि विभाग अंतर्गत 520 असे एकुण 646 विक्री केंद्राची तपासणी केली आहे. सातारा जिल्हात कृषि निविष्ठा विक्री केंद्राची तपासणी करुन आढळून आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने 7 कृषि निविष्ठा विक्री केंद्राना दस्ताऐवज अदयावत न ठेवलेबाबत सक्त ताकीद दिली आहे .तसेच 3 कृषि निविष्ठा विक्री केंद्राचा परवाना निलंबीत केले आहेत.सन 2020-21 मध्ये 4 बियाणे दुकाने 10 खत दुकाने व 3 किटकनाशके दुकाने यांना विक्रीवंद आदेश देण्यात आलेला आहे.
दिनांक 9 जुन 2020 रोजी कोल्हापुर विभागीय भरारी पथकाकडुन म्हासुर्णे ता.खटाव येथील मे.माळवे फर्टिलायझर या दुकानावर छापा टाकुण विना परवाना विक्रीसाठी ठेवलेल्या पिडीएम पोटॅश खताच्या 360 गोण्या जप्त करुन वडूज पोलिस स्टेशन मध्ये सबंधितांवर गुन्हा दाखल केला.दिनांक 10 जुन 2020 रोजी कृष्णा फर्टिलायझर,पानवन,ता.माण या खत कारखाण्यावर जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक सातारा यांनी छापा मारुन विना परवाना तयार होत असलेला बोगस खताचा साठा यामध्ये फॉस्फेट रिच ऑरगॅनिक मॅनियुर च्या 50 बॅग ,नॅचरल पोटॅश च्या 235 बॅग ,ca:mg:s(10:5:10) च्या 295 बॅगा असा एकुण सुमारे 4 लाख 98 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन या कंपनी विरुध्द म्हसवड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
सन 2020-21 मध्ये कोविड च्या पार्श्वभुमिवर खते उपलब्धता व वाहतुक लॉकडॉनच्या कालावधीत सुरळीत होण्याच्या दृष्टीने बांधावर खते, बियाणे पुरवठयामध्ये सातारा जिल्हयात खते / बियाणे बांधावर पुरविण्यासाठी 1037 गटांमार्फत खते यांचा 5001 मे. टन खते व 1974.23 क्विटल बियाणे वाटप करण्यात आले त्यामध्ये 17022 शेतकरी सहभागी झाले.