ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीची मोठी हानी – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख


स्थैर्य, मुंबई, दि.०५: मराठीसह हिंदी सिनेमांमध्ये अभिनेत्री आणि खलनायिका महणून आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांच्या निधनाने सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, सत्तरच्या दशकापासून आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या श्रीमती शशिकला यांना केंद्र शासनामार्फत दिला जाणारा पद्मश्री आणि व्हि. शांताराम लाईफ टाईम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. शशिकला यांनी आजपर्यंत सिनेसृष्टीत दिलेले योगदान मोठे असून त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचा कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो ही प्रार्थना.


Back to top button
Don`t copy text!