मंदिरे सुरू करण्याचा निर्णय हळूहळू घेतला जाईल, भक्तांना आणखी काहीकाळ प्रतिक्षा करावी लागणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


 

स्थैर्य, मुंबई, दि.११: धार्मिकस्थळे सुरू करण्यासाठी राज्यामध्ये भाजपसह विविध संघटनांकडून आंदोलने केली जात आहे. यासोबतच धार्मिक स्थळे सुरू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मंदिरे आत्ताच सुरू करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धार्मिक स्थळे उघडण्याविषयी बोलले की, ‘ मंदिरे सुरू करण्याचा निर्णय हळूहळू घेतला जाईल. घाईघाईत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. राज्यातील प्रार्थनास्थळे सुरू होण्यासाठी भक्तांना आणखी काहीकाळ प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून गर्दी करू नका असे आवाहन मी सर्वांना करत आहे. आता सणउत्सवांमध्ये सर्व धर्मीयांनी माझे बोलणे ऐकले. आता तर दिवाळी आणि नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्यामुळे या कालावधीतही आपल्याला सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायचे आहे. यासोबतच चेहऱ्याला मास्क लावणे हे बंधनकारक असणार आहे. यापुर्वीच्या सणांपूर्वी सर्वांनी जशी खबरदारी घेतली तशीच यापुढेही घ्यायची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!