पक्ष जो निर्णय घेईल तोच अंतिम असेल; पुणे पदवीधर बाबतीत श्रीमंत संजिवराजेंची प्रतिक्रिया


स्थैर्य, फलटण, दि. ७ : पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना संधी मिळावी. अशी मागणी गेले काही दिवसापासून सातारा जिल्ह्यातून जोर धरू लागली आहे. या बाबत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना छेडले असता माजी केंद्रीय मंत्री व खासदार शरदचंद्रजी पवार व पक्ष श्रेष्टी जो निणर्य घेतील तो आम्हाला मान्य असेल. या पूर्वीही पवार साहेब व पक्ष श्रेष्ठींनी दिलेल्या निर्णयाचे पालन आम्ही सर्वानी केलेले आहे. व या पुढेही पक्ष जो निर्णय घेईल तोच आमच्यासाठी अंतिम असेल असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!