कलाक्षेत्रातील युगप्रवर्तकाचे निधन चटका लावणारे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. ४ : भारतीय नाट्यसृष्टीचा कायापालट करणारे आणि रंगभूमीसह कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांना घडविणारे युगप्रवर्तक असे इब्राहिम अल्काझी यांचे निधन चटका लावून जाणारे आहे. अल्काझींच्या निधनामुळे कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, अल्काझी यांचे भारतीय नाट्यसृष्टींचा कायापालट करण्यापासून ते आताच्या अनेक दिग्गज कलाकारांना घडविण्यात मोठे योगदान आहे. ते उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक तर होतेच पण तितकेच उत्तम चित्रकार, छायाचित्रकार आणि शिल्पकारही होते. लंडनमधून युरोपियन नाट्यशास्त्राचा अभ्यास करून परतल्यावर त्यांनी भारतातही नाट्यक्षेत्रात बदलांचे युग आणले. कला क्षेत्रात त्यांनी ‘थियटर युनिट, जहाँगीर आर्ट गॅलरी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा यांच्या माध्यमातून आयुष्यभर वेगवेगळे प्रयोग केले. मराठी रंगभुमीविषयी जिव्हाळा असणाऱ्या अल्काझी यांना आंतरराष्ट्रीय कलाक्षेत्रात मोठा सन्मान दिला जात असे. कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित अल्काझी यांच्यासाठी कला क्षेत्र हेच श्वास होता. त्यांच्या जाण्यामुळे नाट्यक्षेत्रासह अनेक कलांचा अभ्यास असणारा व्यासंगी आधारवड गेला आहे. त्यामुळे भारतीय कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अल्काझींचे भारतीय कला क्षेत्रातील योगदान कदापिही न विसरता येणार नाही. कलाक्षेत्राच्या या युगप्रवर्तकाला भावपूर्ण श्रध्दांजली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!