वशिल्याचे दिवस संपले असून मेरिट दाखवावे लागेल – अजितदादा पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ एप्रिल २०२३ । वडूज । सध्या शिक्षण संस्थेची घडी चांगल्या माणसाच्या हातात असेल तर शिक्षण संस्था उंचीपर्यंत पोहोचते. शिक्षण संस्था काढणे अवघड नसून त्यासाठी सातत्याने टिकवणे अवघड झाले आहे. वडूज नगरीत दादासाहेब गोडसे यांनी जिथे हात घातला तिथे सोने करून दाखवले आहे. वीर व देशभक्तांच्या भूमीत त्यांनी काम केले आहे. आता वशिल्याचे दिवस संपले असून मेरिट दाखवावे लागेल असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी वडूज ता. खटाव येथे झालेल्या दादासाहेब गोडसे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथ तुला व प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमात केले.

या सोहळ्यासाठी सौ रुख्मिणी गोडसे, खासदार श्रीनिवास पाटील ,ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, आमदार शशिकांत शिंदे, प्रभाकर देशमुख, रणजीत देशमुख, सुरेंद्र गुदगे, नितीन पाटील, उदय सिंह पाटील- उंडाळकर, जितेंद्र पवार, मनोज पोळ, राजेंद्र शेलार ,डॉ. संतोष गोडसे, डॉ बी जे काटकर, हिंदुराव गोडसे, सुनील माने, प्रदीप विधाते, संदीप मांडवे, डॉ महेश गुरव, अजित कंठे, राहुल सजगणे, नंदकुमार मोरे, सागर पोळ, बाळासाहेब सावंत, मनोज कुंभार, किरण पाटील, हणमंत खुडेसर, डॉ. प्राचार्य एस बी पाटील, नितीन बुरुंगले, दिलीप डोईफोडे, भाग्यश्री भाग्यवंत, अशोक गोडसे, दिलीप तुपे, श्रीमती शशिकला देशमुख, तानाजीराव वायदंडे, आर पी राऊत, साबळे सर, आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात कोनशिला अनावर व ग्रंथ तुला तसेच छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या वेळेला दादासाहेब गोडसे यांच्या जीवनावरील लेखक अनिल बोधे यांनी संपादित केलेले पुस्तकाचे प्रकाशन अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर चित्रफिती व पत्रकार बाबुराव शिंदे यांनी लिहिलेले मानपत्र वाचन करण्यात आले. तसेच सत्कार मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. चित्र फिती दाखविण्यात आली.

यावेळी या कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी, शिक्षक वर्ग, प्राध्यापक, सातारा जिल्ह्यातील विविध गावचे सरपंच व उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते. आपल्या रोखठोक भाषणामध्ये अजित पवार यांनी सांगितले की, हनुमान जयंती, महावीर जयंती, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद असा एकत्रित सोहळा होत आहे त्यानिमित्त त्यांनी शुभेच्छा व विनम्र अभिवादन केले.

छत्रपती शिक्षण संस्थेमध्ये सात हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून चारशे कर्मचारी कार्यरत आहेत. सध्याचा काळ हा मेरिटचा असून गुणवत्ता असेल तरच शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतला जातो. पूर्वीचा काळ वेगळा होता. आताचा काळ खूप चांगला आहे. कारण न्यायालयाच्या मार्फत त्याच्यावर अंकुश ठेवला जात आहे. हे सांगणे गरजेचे आहे. जुना काळ गेला आहे. असे स्पष्ट केले
यावेळी अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून दादासाहेब गोडसे यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी संगीतकार विरेंद्र केंजले यांचा सदाबहार गाण्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमा नंतर सर्वांना भोजनाचा आस्वाद अनेकांनी घेतला. प्रास्ताविक पृथ्वीराज गोडसे यांनी केले तर आकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.


Back to top button
Don`t copy text!