महावसुली आघाडी सरकारच्या काळातील राजकारणाचे गुन्हेगारीकरण चिंताजनक – चंद्रकांतदादा पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.२५: काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार हे महावसुली आघाडी सरकार असून सध्या राज्यातील राजकारणाचे होणारे गुन्हेगारीकरण ही अतिशय चिंतेची बाब आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी ठाणे येथे केली. आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाची अवस्था लिंबूटिंबू खेळाडूसारखी झाली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

भारतीय जनता पार्टीच्या शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस आ. रविंद्र चव्हाण, भाजपा ठाणे शहराध्यक्ष आ.निरंजन डावखरे, आ. संजय केळकर, ठाणे शहर संघटन चिटणीस साठे, प्रदेश कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील, नगरसेवक ॲड. संदीप लेले, नगरसेवक भरत चव्हाण उपस्थित होते.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय ज्यांचं राजकारण सुरू होत नाही अशा लोकांच्या राज्यातच महिलांवर अत्याचार आणि खंडणी यासारखे गुन्हे घडत आहेत. महावसुली आघाडी सरकारच्या जोखडातून महाराष्ट्राला वाचविण्याची गरज आहे. सध्या महाराष्ट्रातील जनता भीतीच्या छायेखाली असून लोक आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत.

खंडणी घेणाऱ्या सरकारला समर्पण निधीचे महत्व काय कळणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


Back to top button
Don`t copy text!