जबरी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा , सातारा कडून उघड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.१०: सातारा तालूका पोलीस ठाणे गु.र.नं .५१२ / २०२० भादविक ३ ९ २ या गुन्हयातील संशईत इसम सातारा शहरातील भूविकास बँक चौक सातारा येथे येणार असल्याबाबत खात्रीशिर बातमी प्रापत झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक तयार करण्यात आले . त्या पथकास नमुद संशईत इसमास ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या . त्याप्रमाणे पथकाने भुविकास बँक चौक सातारा येथे सापळा लावून मिळाले बातमीप्रमाणे संशईत इसम मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे नमुद गुन्हयाचे अनुशंगाने सखोल विचारपुस केली असता त्याने सातारा तालूका पोलीस ठाणे गु.र.नं .५१२ / २०२० भादविक ३ ९ २ हा गुन्हया केल्याची कबुली दिली . तसेच त्याचे अंगझडतीमध्ये नमुद गुन्हयात चोरी केलेला १०,००० रुपये किमतीचा मोबाईल हॅन्डसेट मिळून आला असून नमुद हॅन्डसेटचे बॅक कव्हरमध्ये फिर्यादी यांचे मुळ आधार कार्ड व वाहन चालविण्याच्या परवान्याची छायांकित प्रत मिळून आले आहे . श्री.अजय बन्सल पोलीस अधीक्षक , सातारा , श्री.धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे सुचनांप्रमाणे श्री.सर्जेराव पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा , सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री.प्रसन्न जहाड , पो.हवा.सुधीर बनकर , अतिश घाडगे , संजय शिर्के , विजय कांबळे , शरद बेबले , साबीर मुल्ला , प्रविण फडतरे , मुनीर मुल्ला , प्रमोद सावंत , निलेश काटकर , विशाल पवार , रोहित निकम , विजय सावंत यांनी नमुद कारवाईमध्ये सहभाग घेतला आहे .


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!